फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये गणपतीला पूजनीय प्रथम देवता मानले जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी एकदंत संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. ही तिथी खूप खास असणार आहे. कारण यावेळी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येत आहे त्यामुळे तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. अंगारकी संकष्टी चतुर्थीला पूजा करण्याची पद्धत, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ जाणून घेऊया
पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथीची सुरुवात मंगळवार, 5 मे रोजी सकाळी 5.24 वाजता होणार आहे आणि बुधवार, 6 मे रोजी सकाळी 7.51 वाजता ही तिथी संपणार आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदय आणि उदयतिथीच्या आधारावर केला जातो. त्यामुळे, मंगळवार 5 मे रोजी चतुर्थी तिथी चंद्रोदयाच्या वेळी असेल, म्हणून उपवास मंगळवार, 5 मे रोजी केला जाईल. या दिवशी चंद्रोद्य रात्री 10.31 वाजता आहे.
संकष्टी चतुर्थीला ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करा आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करा. त्यानंतर हातात पाणी घेऊन उपवास करण्याचा संकल्प करा. नंतर आसनावर लाल वस्त्र अंथरून गणपतीच्या मूर्तीची स्थापना करा. गंगाजलाने अभिषेक करा.
गणपतीला तांदळाचे दाणे, फुले, धूप, दिवा आणि दुर्वा अर्पण करा. त्याला कुंकवाचा टिळा लावा. नंतर गणपतीला मोदक किंवा लाडू याचा नैवेद्य दाखवा. पूजा झाल्यानंतर ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करा आणि संकष्टी चतुर्थीची कथा वाचावी किंवा ऐकावी. रात्री चंद्राचे दर्शन करून उपवास सोडावा.
संकष्टी चतुर्थी हा हिंदू धर्मातील भगवान गणेशाला समर्पित एक महत्त्वाचा उपवास आणि सण आहे. हा सण प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. संकटे दूर करणे आणि इच्छापूर्ती होणे याच्याशी याचे विशेष महत्त्व जोडलेले आहे. संकष्टी या शब्दाचाच अर्थ संकटे दूर करणारी असा आहे. या दिवशी उपवास आणि गणपतीची पूजा केल्याने जीवनातील दुःख, अडथळे आणि अडचणी दूर होण्यास मदत होते. गणपतीला अडथळे दूर करणारा आणि सर्वात पूजनीय देवता मानले जाते. या दिवशी विशेष प्रार्थना केल्याने कामातील अडथळे दूर होण्यास मदत होते.
यंदा एकदंत संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते. शास्त्रानुसार जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. अंगारकी चतुर्थीचे फायदे इतर चतुर्थीच्या दिवसांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ दोष किंवा मंगळाचे वजन जास्त असेल, त्यांनी या दिवशी उपवास करून गणपतीची पूजा करावी. यामुळे मंगळाचे अशुभ प्रभाव शांत होतात आणि कामातील अडथळे दूर होतात. याच दिवशी शिवयोगाची निर्मिती होते, जो ध्यान आणि आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला “एकदंत संकष्टी चतुर्थी” म्हणतात, हा दिवस भगवान गणेश (एकदंत) यांना समर्पित असून संकट दूर करण्यासाठी विशेष मानला जातो
Ans: “संकष्टी” म्हणजे संकट दूर करणारी चतुर्थी, या दिवशी गणेशपूजा केल्याने: अडथळे दूर होतात मनोकामना पूर्ण होतात कर्ज, अडचणी कमी होतात जीवनात सुख-समृद्धी येते
Ans: यंदा एकदंत संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते. शास्त्रानुसार जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. अंगारकी चतुर्थीचे फायदे इतर चतुर्थीच्या दिवसांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत.






