Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sai Baba Story: साईंचा शिर्डीतील पहिला प्रवेश आणि कोणी ठेवले साई नाव

शिर्डीचे साईबाबा प्रथम शिर्डीत कसे आले, त्यांना 'साई' हे नाव कसे मिळाले आणि कडुलिंबाच्या झाडाखालील रहस्यमय स्थळाचे महत्त्व काय आहे, याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. या कथांनुसार साईबाबांच्या प्रारंभीच्या शिर्डीतील वास्तव्यामुळेच गावकऱ्यांच्या मनात त्यांच्याविषयी श्रद्धा निर्माण झाली आणि पुढे ते लाखो भक्तांचे श्रद्धास्थान बनले.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 30, 2026 | 08:47 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • शिर्डीत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम खंडोबा मंदिरात दर्शन घेतले
  • म्हाळसापती, शामा आणि वैजामाई हे साईबाबांचे सुरुवातीचे भक्त मानले जातात
  • सुमारे तीन वर्षांनी ते चांद पाटील यांच्या वरातीसोबत पुन्हा शिर्डीत परत आल्याची परंपरा आहे.
 

शिर्डीचे साईबाबा हे भारतातील सर्वाधिक पूजनीय संतांपैकी एक मानले जातात. त्यांच्या जीवनातील अनेक घटना आजही भक्तांसाठी श्रद्धेचा विषय आहेत. साईबाबा प्रथम शिर्डीत कसे आले, त्यांनी कडुलिंबाच्या झाडाखाली वास्तव्य का केले आणि त्यांना ‘साई’ हे नाव कसे मिळाले, याविषयी अनेक परंपरागत कथा सांगितल्या जातात. या कथांमधून त्यांची गुरुभक्ती, साधेपणा आणि सर्वधर्मसमभावाची शिकवण स्पष्ट होते.

गुरू व्यंकुश यांच्या आज्ञेनुसार साईबाबा प्रथम शिर्डीत आले

आपले गुरू व्यंकुशाच्या परवानगीने साईबाबा भटकंती करत शिर्डीला पोहोचले त्यावेळी शिर्डीमध्ये एकूण 450 कुटुंब राहत होते. शिर्डीच्या सभोवताली घनदाट जंगल होतं. तिथे बाबांनी प्रथम खंडोबा मंदिराला भेट दिली आणि नंतर व्यंकुशाने सांगितलेल्या कडुलिंबाच्या झाडाकडे गेले. कडुलिंबाच्या झाडाभोवती एक ओटा बांधलेला होता. जिथे बाबा काही वेळ बसून भीक मागत आणि नंतर बाबा गावात भीक मागण्यासाठी निघत गावकऱ्यांनी त्यांना भिक्षा म्हणून भरपूर अन्न दिले ते खाऊन झाल्यानंतर उरलेले अन्न त्यांनी आपल्या मागे येणाऱ्या कुत्राला खाऊ घातले आणि मग कडुलिंबाच्या झाडाजवळ परत येऊन बसले हीच त्यांची रोजची दिनचर्या बनली.

Sai Baba Story: आयुष्य घडवणाऱ्या साईबांबाची प्रमुख तत्व कोणती …

गावकऱ्यांच्या विनंतीवरून कडुलिंबाच्या झाडाखालील जागा खोदण्याची कथा

कडुलिंबाच्या झाडाखाली बसण आणि उठणं, बसून ध्यान करणं ही मग गावामध्ये भीक मागण्यासाठी निघणं. काही लोकांनी कुतूहलाने त्यांना विचारलं की ते कडुलिंबाच्या झाडाखाली का राहतात? बाबांनी उत्तर दिलं त्यांच्या गुरूंनी इथे ध्यान केलं होतं म्हणून ते इथे विश्रांती घेतात. काही लोकांनी यावेळी त्यांची थट्टा केली आणि बाबांनी त्यांना सांगितलं जर त्यांनी काही शंका असेल तर त्यांनी या जागी खोदून पाहावं. गावकऱ्यांनी त्या जागी खोदलं आणि त्यांना तिथे खडक सापडला. दगड बाजूला केल्यानंतर तिथे एक दरवाजा दिसला जिथे चार दिवे तेवत होते तो दरवाजा एका गुहेत उघडत होता जिथे गाईसारखी रचना, लाकडी फळ्या आणि फुलांच्या माळा होत्या.

गावकऱ्यांच्या मनात साईबाबांबद्दल श्रद्धा निर्माण होणे

या घटनेनंतर लोकांच्या मनात बाबांविषयी भक्ती जागृत झाली. बाबांनी आपल्या पिशवीतून विट काढली ती दिव्याच्या समोर ठेवली आणि गावकऱ्यांना तो दरवाजा पुन्हा बंद करायला सांगितला. म्हाळसापती शामा आणि शिर्डीचे इतर भक्त या जागेला बाबांच्या गुरुजी समाधी मानत होते आणि त्यांना नेहमी वंदन करत असे. गावातील प्रतिष्ठित लोकांमध्ये म्हाळसापती आणि शामा हे बाबांची अनुयायी बनले. वैजामाई नावांची स्त्री होती ती दररोज बाबांना भिक्षा देत असे. जर बाबा भिक्षा घेईला येऊ शकले नाही तर ती बाबांना कडुलिंबाच्या झाडाजवळ जाऊन स्वतः त्यांना भिक्षा देई.

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा

सुमारे तीन वर्षांनी चांद पाटील यांच्या वरातीसोबत पुन्हा शिर्डीत आले

बाबा हिंदू होते की मुस्लिम यांवरून गावातील हिंदू मुस्लिमांमध्ये नेहमी वाद सुरू होता. तीन महिन्यानंतर कोणालाही न कळवता बाबा शिर्डी सोडून निघून गेले. त्यांचा अनेकांनी शोध घेतला पण ते सापडले नाही. अचानक तीन वर्षांनंतर धूपखेडामधील मुस्लिम जमीनदार चांद पाशा पाटील यांच्यासोबत त्यांच्या वहिनीच्या लग्नात पाहुणे म्हणून परत आले.

म्हाळसापती यांनी “या साई!” असे संबोधल्यानंतर त्यांना ‘साईबाबा’ हे नाव मिळाल्याची परंपरागत श्रद्धा

यावेळी एक तरुण फकिराच्या वेशात बाबा म्हाळसापतीच्या घरी गेले आणि म्हाळसापतींनी त्यांना या साई आहो साई असं म्हणत स्वागत केलं तेव्हापासूनच त्यांना साईबाबा असं नाव पडलं, अशी कथा मानली जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: साईबाबा प्रथम शिर्डीत कसे आले होते?

    Ans: परंपरागत कथांनुसार, साईबाबा आपल्या गुरू व्यंकुश (वेंकुशा) यांच्या आज्ञेनुसार भ्रमंती करत प्रथम शिर्डीत आले.

  • Que: साईबाबांना 'साई' हे नाव कोणी दिले?

    Ans: परंपरेनुसार, शिर्डीतील खंडोबा मंदिराचे पुजारी म्हाळसापती यांनी "या साई!" असे संबोधल्यानंतर त्यांना 'साईबाबा' हे नाव मिळाले.

  • Que: कडुलिंबाच्या झाडाखालील गुरूस्थानाचे महत्त्व काय आहे?

    Ans: भक्तपरंपरेनुसार, त्या ठिकाणी साईबाबांच्या गुरूंनी तपश्चर्या केली होती. त्यामुळे साईबाबा त्या जागेला अत्यंत पवित्र मानत असत.

Web Title: Sai baba story how sai baba got the name sai and his first entry into shirdi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 08:47 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.