फोटो सौजन्य- chatgpt
शिर्डीचे साईबाबा यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही भक्तांना श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा संदेश देतात. त्यापैकी गव्हाचे पीठ दळून कॉलऱ्याच्या साथीपासून गावाचे संरक्षण केल्याची कथा अत्यंत प्रसिद्ध आहे. या प्रसंगाचा उल्लेख ‘श्री साई सच्चरित्र’ या ग्रंथात आढळतो. साईबाबा आणि त्यांचे भक्त अनेकदा ही कथा सांगतात ती म्हणजे 1910 साली बाबांनी कॉलराची साथ कशी नाहिशी केली आणि चमत्कार घडविला. ही नक्की कथा काय आहे ते जाणून घेऊया
एकेदिवशी सकाळी साईबाबांचे भक्त त्यांच्या घरी पोहोचले. त्यांना साईबाबांनी घेतलेले चणे आणि गहू पाहून आश्चर्य वाटलं त्यांनी एका टोपलीत थोडेसे गहू घेतले आणि मग आपल्या कपनीची माई वर करून गिरणीचं मुठा पकडला. मुठभर गहू गिरणीच्या वरच्या छिद्रात टाकत ते फिरवू लागले. साईबाबा गहू दळत होते.
भक्तांना आता धक्काच बसला कारण साई नियमित भिक्षा मागून जगत होते लवकरच गावकऱ्यांचा जमाव जमला ज्यामध्ये चार स्त्रिया होत्या. त्यांनी अखेरीस धाडस करून बाबांचा हात धरला आणि बाबांसाठी देवाची स्तुती करणारे गीत गाऊ लागल्या. गावकऱ्याचं प्रेम आणि भक्ती पाहून बाबा किंचितचे हसले मग त्या चार स्त्रियांनी गहू दळायले घेतले. गहू दळत असताना त्या स्त्रियांनी विचार केला बाबांना घर नाही, मालमत्ता नाही, मुलं नाहीत काळजी घेणारंही कोणी नाही ते भिक्षा मागून जगतायत. त्यांना भाकरी किंवा पोळी बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाची गरजही नाही आहे मग ते एवढ्या मोठ्या प्रमाणात पिठाचं काय करणार आहेत. कदाचित बाबा खूप द्याळू असतील म्हणून ते एवढं पीठ आपल्या सर्वांमध्ये वाटून घेतील.
गहू दळून झाल्यानंतर महिलांनी पिठांचे चार भाग केले हे पाहिल्यानंतर मात्र शांत आणि संयमी असलेले बाबा संतापले. संतापून ते त्यांना म्हणाले, तुम्ही वेड्या झालात का? हे पीठ चोरण्याची तुमची हिंमत तरी कशी झाली, तुम्हाला काय वाटत ही तुमच्या वडलांची मालमत्ता आहे, मी तुमच्याकडून एक पैसाही गहू उसन घेतलेलाही नाही आहे. आता कृपया हे पीठ घ्या आणि गावाच्या सीमेवर फेकून या. हे ऐकून महिलांना लाच वाटली आणि त्यांनी बाबांच्या सूचनेप्रमाणे पीठ पसरवले.
त्यावेळी गावामध्ये कॉलराची साथ चालू होती आणि सच्चरित्रा’मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे बाबांनी गव्हाचे पीठ पेरण्याचा उपाय त्यावर केला होता. गावाच्या वेशीवर गव्हाचे पीठ पसरवून कॉलरा गावातून हकलवून दिलं. यानंतर कॉलराची साथ उसळली आणि गावकरी आनंदी झाले. भक्तांसाठी हा एक मोठा चमत्कारचं होता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: 'श्री साई सच्चरित्र'मध्ये वर्णनानुसार, शिर्डीमध्ये पसरलेल्या कॉलऱ्याच्या साथीपासून गावाचे रक्षण व्हावे, या हेतूने साईबाबांनी गहू दळून त्याचे पीठ गावाच्या सीमेवर पसरवण्यास सांगितले.
Ans: या प्रसंगातून साईबाबांनी संकटाचा सामना श्रद्धा, सेवा आणि लोककल्याणाच्या भावनेने करण्याचा संदेश दिला, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
Ans: ही कथा श्रद्धा, सबुरी, निःस्वार्थ सेवा, लोककल्याण आणि ईश्वरावरील अढळ विश्वास यांचा संदेश देते. तसेच संकटाच्या काळात समाजहिताला प्राधान्य देण्याची प्रेरणा देते.






