Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sai Baba Story: दातोबांच्या दुःखामागील कारण काय होते? जाणून घ्या साईबाबांची प्रेरणादायी कथा

शिर्डीचे साईबाबा यांनी आपल्या आयुष्यात अनेक भक्तांवर कृपा करून त्यांचे दुःख दूर केले, अशा अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्यापैकी दातोबा यांची कथा श्रद्धा, सबुरी, कर्माचे फळ आणि साईबाबांच्या असीम कृपेचा संदेश देणारी अत्यंत प्रेरणादायी कथा मानली जाते

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 06, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • दातोबांच्या दुःखामागील कारण काय होते
  • साईबाबांनी पूर्वजन्मातील कर्माचे रहस्य सांगितले
  • दुःख हे पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ असल्याचे स्पष्ट केले
 

 

साईबाबा आणि दातोबा यांची कथा ही त्यांच्या सर्वोच्च चमत्काराची आणि त्यांच्यामधील जन्मातील कर्मातील परिणामांची अत्यंत हृद्यस्पर्शी गाथा आहे. ही कथा रामानंद सागर यांच्या लोकप्रिय साईबाबा मालिकेतही तुम्ही पाहिली असेल.

दातोबा कुष्ठरोगाने त्रस्त होते

दातोबा आपली पत्नी भगिरथी आणि त्यांची मुलगी जनी यांच्यासोबत अत्यंत हलाखीचे जीवन जगत होते. तसंच दातोबा एका कुष्ठरोगाने त्रस्त होते त्यांची द्यनीय अवस्था पाहून मैना नावाच्या स्त्रीने त्यांना भोजन दिले आणि शिर्डीतील साईबाबांकडे जाण्याचा सल्ला दिला. कारण बाबांच्या कृपेने प्रत्येक आजार बरा होतो असा तिचा विश्वास होता. दातोबाचं कुटुंब शिर्डीच्या वाटेवर असताना त्यांची भेट कुलकर्णी आणि द्वारकानाथ यांच्याशी झाली. त्यांनी साईबाबांविषयी खोट्या अफवा पसरवल्या होत्या ज्यामुळे दातोबा घाबरले. दातोबांनी शिर्डीला जाण्याचा बेत सोडून रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या आजारांच्या असह्य वेदनेने कंटाळून दातोबा आत्माहत्या करण्यासाठी जंगलाकडे निघाले. तेव्हा साईबाबा अदृश्य रुपात प्रकट झाले आणि त्यांनी त्यांची पत्नी भागी आणि मुलगी जनी यांना जागं केलं.

Sai Baba Story: साईंचा शिर्डीतील पहिला प्रवेश आणि कोणी ठेवले साई नाव

सिंहापासून जनीचे प्राण वाचवले

एका फकिराच्या रुपात येऊन दातोबाचं सांत्वन केलं आणि त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे परत पाठवलं तर जंगलातून जात असताना या कुटुंबाचा अचानक एका क्रुर सिंहाशी सामना झाला. घाबरुन मुलगी जनीने मोठ्याने साईबाबांना हाक मारली. बाबा स्वतः प्रकट झाले आणि त्यांनी तिला सिंहापासून वाचवलं. सिंह निघून गेल्यानंतर जैनीला बाबांच्या पावलांचे ठसे दिसले.

बाबांच्या चरणधुळीने दातोबा बरे झाले

जैनीने त्या पवित्र पावलांच्या ठसांची पावडर वडील दातोबा यांच्या चेहऱ्यावर लावली त्यामुळे त्यांचा चेहरा त्वरित बरा झाला. जेव्हा दातोबा यांचे कुटुंब शिर्डीत आले तेव्हा साईबाबांनी एक लीला केली आणि स्वतः मात्र वेड्यासारखे वागू लागले. मुलगी जैनीला वाटले ते खरोखरच वेडे झालेत आणि जंगलात तिचा जीव वाचवणारे साईबाबा ते हेच आहेत यावर तिचा विश्वास बसत नव्हता.

साईबाबांनी पूर्वजन्माचे रहस्य सांगितले

दरम्यान दातोबांना खूप ताप आला आणि ते द्वारकामाईला गेले तिथे साईबाबांनी एक दिव्य दर्शन दिले. त्यामुळे त्यांना मागील जन्माची एक झलक मिळाली. मागील जन्मात दातोबा एक अत्यंत क्रुर, गर्विष्ठ आणि अन्यायी व्यक्ती होते. ज्यांनी अनेक लोकांचा छळ केला होता. बाबांनी त्यांना समजावून सांगितलं की, या जन्मातील आजारपण आणि दुःख हे त्यांच्या मागील जन्मातील कर्माचे फळ आहे. बाबांनी दातोबांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या मागील जन्मातील पापी कृत्याचे फळ पूर्ण भोगलं आहे त्यानंतर बाबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या चरणांच्या धुळीने दातोबांचा पायांचा आणि शरीराचा संपूर्ण आजार कायमचा बरा झाला. दातोबा आणि त्याचं कुटुंब रडू लागलं आणि बाबांच्या चरणी लीन होऊन भक्तीभावाने त्यांची आरती केली.

Sai Baba Story: आयुष्य घडवणाऱ्या साईबांबाची प्रमुख तत्व कोणती …

या कथेतून मिळणारा संदेश

या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की, माणसाला त्यांच्या कर्माचे फळ हे भोगावे लागतात. परंतु जेव्हा एखादा भक्त खऱ्या मनाने देवाला किंवा गुरूला हाक मारतो तेव्हा देव त्याचं दुःख दूर करतो आणि त्याला मार्गही दाखवतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: दातोबा कोण होते?

    Ans: दातोबा हे शिर्डीच्या साईबाबांचे भक्त होते. पौराणिक कथेनुसार ते कुष्ठरोगाने त्रस्त होते आणि साईबाबांच्या कृपेने त्यांना आरोग्य लाभले.

  • Que: साईबाबांनी दातोबांची कशी मदत केली?

    Ans: साईबाबांनी संकटाच्या वेळी दातोबांचे रक्षण केले, त्यांना पूर्वजन्मातील कर्माची जाणीव करून दिली आणि त्यांच्या कृपेने त्यांचा आजार दूर झाला, असे कथेत सांगितले जाते.

  • Que: दातोबांची कथा कोणत्या माध्यमातून लोकप्रिय झाली?

    Ans: ही कथा शिर्डी साईबाबांच्या जीवनावर आधारित धार्मिक कथांमधून तसेच रामानंद सागर यांच्या लोकप्रिय मालिकेमुळे अनेकांपर्यंत पोहोचली.

Web Title: Sai baba story what was the reason behind datoba sadness inspiring story of sai baba

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • shirdi

संबंधित बातम्या

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत
1

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा
2

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.