
Sarva Pitru Amavasya 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
पितरांचे श्राद्ध कोणत्याही वेळी करू नये, त्यासाठी शुभ मुहूर्त असतो. 10 ऑक्टोबरसाठी मुहूर्त असा आहे.
सकाळी लवकर उठा. आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. सगळ्यात आधी आपल्या पितरांची आठवण करा. माझ्या कुटुंबातील सर्व ज्ञात आणि अज्ञात पितरांच्या आत्म्याला शांती मिळो असा संकल्प मनात करा. त्यानंतर आपल्या इष्ट देवतेचं आणि भगवान विष्णूचं नाव घ्या.
एका तांब्यात स्वच्छ पाणी घ्या, त्यात थोडे काळे तीळ टाका आणि आपल्या पूर्वजांच्या नावाने ते पाणी अर्पण करा. यालाच तर्पण म्हणतात. खरा विधी, मंत्र, दिशा कोणती असावी, जानवं कसं घालावं हे सगळं एखाद्या जाणकार ब्राह्मणाला विचारूनच करा. उगाच काहीतरी करू नका.
सर्वपित्री अमावस्येला दानाला खूप महत्त्व आहे. या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने अन्नदान करावं.ब्राह्मणांना आणि गरजू लोकांना जेवण द्या. धान्य दान करा. गाय, कुत्रा, कावळा यांना पण खायला घाला. कारण या प्राण्यांच्या रूपाने पितर येतात असं मानतात.
Sarva Pitru Amavasya: सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी हे पदार्थ बनवणे टाळा, जाणून घ्या कारण
तुम्ही तांदूळ, गहू, गूळ, तूप, कपडे दान करू शकता. या दिवशी केलेलं दान कधीच वाया जात नाही. त्याचं पुण्य थेट पितरांना मिळतं. मनापासून आपल्या पूर्वजांची माफी मागा आणि घरात सुख, शांती, पैसा राहू दे अशी प्रार्थना करा. श्रद्धेने केलेलं दान सगळ्या इच्छा पूर्ण करतं.म्हणून 10 ऑक्टोबरला विसरू नका, आपल्या पितरांसाठी थोडा वेळ नक्की काढा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)