
फोटो सौजन्य- pinterest
श्रावण सोमवारचे व्रत केल्याने अविवाहित मुलींना मनासारखा वर मिळतो, तर विवाहित महिलांना सुखी वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. यंदा श्रवणातील दुसरा सोमवार २४ ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी अनेक शुभ योग जुळून येणार असून, ज्याचा चार राशींना विशेष लाभ मिळू शकतो. २४ ऑगस्ट रोजी सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होणार आहे. त्याचवेळी कर्क राशीत गुरूच्या स्थितीमुळे हंस राजयोग’ तयार होईल. यासोबतच प्रीती योग आणि पूर्वाषाढा नक्षत्राचा संयोग देखील जुळून येणार आहे. बुधादित्य योगाचा फायदा कोणत्या राशींच्या लोकांना होणार आहे ते जाणून घ्या
दुसरा श्रवणी सोमवार मेष राशीच्या जातकांसाठी शुभ आणि लाभदायक ठरू शकतो. महादेवाच्या कृपेने आर्थिक अडचणी दूर होऊन धनलाभाच्या संधी निर्माण होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी किवा महत्त्वाची संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन व्यवहारातून फायदा होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहून मनातील काही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील.
मिथुन राशीच्या जातकांसाठी दुसरा श्रावणी सोमवार प्रगतीचे नवे मार्ग खुला करणारा ठरू शकतो. रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक किवा सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. या काळात नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.
कर्क राशीच्या व्यक्तींना दुसऱ्या श्रवणी सोमवारी शुभ योगांचा विशेष लाभ मिळू शकतो. अचानक धनलाभ होण्यासोबतच
आर्थिक नियोजनातही चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात.
दुसरा श्रवणी सोमवार धनु राशीच्या जातकांसाठी भाग्याची साथ मिळवून देणारा ठरू शकतो. नवीन संधी मिळाल्याने करिअरमध्ये मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक क्षेत्रात लाभ होऊन उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)