Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dream Meaning: स्वप्नात सूर्यग्रहण दिसण्याचा काय आहे अर्थ? जाणून घ्या शुभ-अशुभ संकेत

आज बुधवार, १२ ऑगस्ट रोजी आषाढ अमावस्येला सूर्यग्रहण आहे. सूर्यग्रहणाचे स्वप्न पाहणे शुभ आणि अशुभ दोन्ही असू शकते. तुम्ही स्वप्नात सूर्यग्रहणाचा कोणता भाग पाहता यावर अवंलबून अवलंबून असते. अंधार आणि ग्रहणे नकारात्मकतेचे प्रतीक आहेत, तर प्रकाश प्रगतीचे प्रतीक आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 12, 2026 | 08:45 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • स्वप्नात सूर्यग्रहण दिसण्याचा काय आहे अर्थ?
  • स्वप्नात सूर्यग्रहण दिसणे शुभ की अशुभ
  • अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी करा हे उपाय
 

 

या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण बुधवार, १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण आषाढ महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी होणार असून, ते भारतातून दिसणार नाही. दरम्यान, याचा प्रभाव सर्व राशींवर निश्चितपणे पडेल. काहींना फायदा होऊ शकतो, तर काहींना नुकसान होऊ शकते. पण काही लोकांना सूर्यग्रहणाचे स्वप्न पडते. या सूर्यग्रहणाचा स्वतःचा असा एक अर्थही आहे. तुम्हाला ग्रहणाचा किती भाग दिसला, ग्रहणानंतर सूर्य पुन्हा उगवताना पाहणे किंवा सूर्यग्रहणाच्या मध्यात जागे होणे, या सर्व सामान्य घटना आहेत ज्यांचा लोक अनुभव घेतात. सूर्यग्रहणाचे स्वप्न पडण्याचा अर्थ काय आहे आणि शुभ अशुभ संकेत कोणते ते जाणून घेऊया

स्वप्नामध्ये सूर्यग्रहण पाहण्याचे शुभ संकेत

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य मान, आदर, पद, प्रतिष्ठा, संपत्ती, धान्य, वडिलांशी असलेले नाते, सरकार, सत्ता, करिअर इत्यादींचे प्रतिनिधित्व करतो. शुभ असताना या गोष्टी सकारात्मक परिणाम देतात, तर अशुभ असताना त्या जीवनातील नकारात्मकता वाढवतात.

जीवनात नवीन संधी निर्माण होणे

स्वप्नशास्त्रानुसार, ज्यांना सूर्यग्रहणाचे स्वप्न पडते, ज्यात सूर्य अंधारात जातो आणि नंतर पुन्हा प्रकाशात येतो, ते एक शुभ चिन्ह आहे. तुमच्या सभोवतालचे अंधकाराचे ढग दूर होतील आणि तुमचा मान, आदर, प्रतिष्ठा व सन्मान वाढेल. जीवनात प्रगतीच्या शक्यता खुल्या होतील आणि नवीन संधी निर्माण होतील.

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

स्वप्नामध्ये सूर्यग्रहण संपताना पाहणे

तुमच्या स्वप्नामध्ये सूर्यग्रहण संपताना पाहता आणि ढग किंवा अंधाराशिवाय सूर्य पुन्हा आकाशात चमकू लागतो. असे स्वप्न अत्यंत शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सूर्याप्रमाणे चमकाल. अडचणी संपतील आणि तुमच्या कामात यश मिळेल. तुमच्यासाठी अनुकूल काळ येत आहे. तुम्ही तुमच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगती कराल. तुमची संपत्ती आणि समृद्धी वाढेल आणि तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पाठिंबा मिळेल.

स्वप्नात सूर्यग्रहण दिसण्याचे अशुभ संकेत

आव्हानात्मक काळ

तुमच्या स्वप्नात सूर्यग्रहण होताना दिसते. सूर्यदेव अंधारात लपलेले असतात. असे स्वप्न तुमच्या सन्मान, आदर, नोकरी, व्यवसाय, राजकारण, पद, प्रतिष्ठा इत्यादींना असलेल्या धोक्याचे संकेत देते. याचा अर्थ असा होतो की, येणारा काळ तुमच्यासाठी आव्हानात्मक असू शकतो. तुम्हाला भीती, चिंता किंवा गोंधळ वाटू शकतो. तुमचे मनोधैर्य खचू शकते आणि तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

सूर्यग्रहणाच्या वेळी पूर्ण अंधार दिसणे

जर तुम्हाला सूर्यग्रहणाच्या वेळी पूर्ण अंधार पाहण्याचे स्वप्न पडले, तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते, व्यवसायात मोठे नुकसान होऊ शकते किंवा गुंतवणुकीतून पैसे गमवावे लागू शकतात. हे कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींचेही सूचक आहे. चालू असलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. तुम्ही स्वतःला अशा परिस्थितीत अडकलेले पाहू शकता, जिथून बाहेर पडण्याचा कोणताही स्पष्ट मार्ग दिसत नाही किंवा तुम्ही अनिर्णयक्षमतेने त्रस्त होऊ शकता.

Deep Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील महत्त्व

सूर्यग्रहण आणि अंधार पाहण्याचा अर्थ

स्वप्नात सूर्यग्रहण आणि अंधार पाहण्याचा अर्थ असाही असू शकतो की, तुमच्या वडिलांसोबतच्या तुमच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो किंवा ते बिघडू शकते. तुम्हाला त्यांची मदत, पाठिंबा किंवा आशीर्वाद मिळणार नाही. तुमच्या मुलांसोबतच्या तुमच्या नात्यावरही परिणाम होऊ शकतो.

सूर्यग्रहणाच्या वेळी अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी उपाय

जर तुम्हाला सूर्यग्रहणाचे स्वप्न पडले, जे एक अशुभ चिन्ह मानले जाते, तर काळजी करू नका. सकाळी उठून स्नान करा. सूर्योदयाच्या वेळी भगवान भास्कराची प्रार्थना करा आणि त्यांना जलार्पण करा. सूर्यदेवाला जलार्पण करणे शुभ मानले जाते. सूर्यग्रहणानंतर १५ दिवस या गोष्टींचे पालन करा. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा आणि ‘ॐ घृणीः सूर्याय नमः’ या सूर्य मंत्राचा जप करा. तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि तुमचे वाईट परिणाम कमी होतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वप्नात सूर्यग्रहण दिसणे शुभ मानले जाते का?

    Ans: स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात सूर्यग्रहण दिसणे हे जीवनातील बदल, मानसिक अस्वस्थता किंवा एखाद्या महत्त्वाच्या टप्प्याचे संकेत मानले जाऊ शकते. त्याचा अर्थ स्वप्नाच्या परिस्थितीनुसार बदलतो.

  • Que: स्वप्नात सूर्यग्रहण संपताना दिसणे शुभ आहे का?

    Ans: स्वप्नशास्त्रातील मान्यतेनुसार ग्रहण सुटताना दिसणे सकारात्मक संकेत मानले जाऊ शकते. अडचणी दूर होऊन परिस्थितीत सुधारणा होण्याचे ते प्रतीक मानले जाते.

  • Que: वारंवार सूर्यग्रहणाचे स्वप्न पडत असल्यास काय करावे?

    Ans: अशा स्वप्नांकडे घाबरून पाहण्याची गरज नाही. झोपेची पद्धत, तणाव आणि दिवसभरातील विचार यांचाही स्वप्नांवर परिणाम होऊ शकतो.

Web Title: Seeing a solar eclipse in a dream means auspicious and inauspicious signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • Dream Meaning

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.