फोटो सौजन्य- pinterest
यंदा शनि अमावस्या 23 ऑगस्ट रोजी आहे. यावेळी शनि देवाची पूजा करण्याव्यक्तिरिक्त पूर्वजांची देखील पूजा केली जाते. या दिवशी लोक पवित्र नदीमध्ये स्नान करुन दान देखील करतात. शनि अमावस्येला स्नान आणि दान केल्याने पापे नष्ट होतात आणि सौभाग्य मिळते. शनि अमावस्येच्या दिवशी स्नान करण्यासोबतच मंत्रांचा जप देखील केला जातो. या मंत्रांचा जप केल्याने तुमचे त्रास दूर होऊन शनि देव प्रसन्न होतात.
शनि अमावस्येच्या दिवशी स्नान केल्यानंतर पूर्वजांच्या या मंत्राचा जप आणि पूजा करु शकता. पूर्वजांच्या या मंत्राचा जप केल्याने पूर्वज प्रसन्न होतात. तसेच दान आणि सेवा केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात असे म्हटले जाते. त्यामुळे पितृदोषसुद्धा दूर होतो.
अमावस्येच्या दिवशी महादेवाची पूजा करु शकता. यावेळी पंचक्षर मंत्र ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करावा. महाकाल भगवान शिव त्यांच्या भक्तांना मोक्ष प्रदान करतात. या मंत्रांचा जप केल्याने महादेवाला तुमच्या पूर्वजांच्या मोक्षासाठी प्रार्थना केली जाते. पूर्वजांना तुमचे कमावलेले पुण्य दान करू शकता. असे म्हटले जाते की, महादेवाच्या कृपेने सर्व प्रकारची पापे आणि दुःखे नष्ट होतात.
तुमच्या जीवनात कोणतेही संकट असल्यास अमावस्येच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने सर्व प्रकारचे अशुभ दूर होतात. नकारात्मक ऊर्जा दूर होते. महादेवाच्या आशीर्वादामुळे चांगले आरोग्य मिळते आणि तो व्यक्ती दीर्घायुषी होतो. त्यासोबतच भीती देखील नष्ट होते.
शनि अमावस्येला गायत्री मंत्रांचा जप करु शकता. या मंत्रांचा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि आत्म्याचे शुद्धीकरण होते. गायत्री मंत्राचा जप करण्यापूर्वी ते शुद्ध असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही असाच जप करणे अशुभ ठरु शकते. गायत्री मंत्राचा जप सुख, शांती आणि विश्व कल्याणासाठी केला जातो.
अमावस्येचा दिवस तंत्र आणि मंत्र सिद्धीसाठी योग्य मानला जातो. यावेळी देवी कालीच्या या मंत्राचा जप करू शकता. त्यामुळे शक्ती मिळेल आणि शत्रूचा नाश होऊ शकतो. त्यासोबतच व्यक्तीमध्ये धैर्य आणि शौर्य वाढते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)