फोटो सौजन्य- pinterest
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संपूर्ण भारतात गणेश चतुर्थी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावेळी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता. चतुर्थीला घरामध्ये बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली जाते. त्याआधी संपूर्ण घराची सजावट केली जाते. यावेळी तुम्हालाही घर सजवायचे असेल तर वास्तूच्या काही नियमांचे पालन करणे फायदेशीर ठरेल. तसेच तुमची बिघडलेली कामे देखील पूर्ण होतात, असे मानले जाते. गणेश चतुर्थीला घर सजवण्यासाठी वास्तूचे नियम जाणून घेऊया
घराची सजावट करताना घराचा मुख्य दरवाजा देखील महत्त्वाचा मानला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी दरवाजावर आंब्याच्या पानांचा हार आणि स्वस्तिक काढावे. त्यासोबतच रांगोळी देखील काढावी. यामुळे नशिबाची साथ मिळते आणि जीवनामध्ये आनंद येतो असे म्हटले जाते. त्यासोबतच तुम्ही घराचा मुख्य दरवाजा झेंडू दरवाजाने सजवायला पाहिजे.
बाप्पाची मूर्तीची स्थापना करण्यासाठी लाकडी स्टँडचा वापर करावा. हा स्टँड नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवावा. त्यानंतर त्यावर पिवळा किंवा लाल वस्त्र घालावे. अशा प्रकारे गणपतीचे आसन सजवणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. ज्या भिंतीजवळ तुम्ही चौकी ठेवता त्या भिंतीच्या मागे तुम्ही केळीची पाने, फुले, फेस्टून इत्यादी ठेवू शकता. त्यामुळे घरामधील वातावरण आनंदी राहते.
घर सजवताना योग्य रंगांचा वापर करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते. घराच्या सजावटीसाठी पिवळा, लाल, हिरवा इत्यादी शुभ, शांत आणि हलके रंग यांचा वापर करावा. दरम्यान काळा आणि गडद निळा अशा रंगांचा वापर करणे टाळावे. शुभ कामासाठी हे रंग चांगले मानले जात नाही.
गणपतीची मूर्ती योग्य दिशेला स्थापना करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. गणपती बाप्पाची मूर्ती ईशान्य दिशेला स्थापित करणे सर्वोत्तम मानले जाते. असे करणे शक्य नसल्यास तुम्ही उत्तर दिशेला गणपतीची मूर्ती देखील ठेवू शकता. चतुर्थीच्या दिवशी सजावट करताना या नियमांचे पालन केल्यास जीवनातील सर्व त्रास आणि अडथळे दूर होऊ शकतात. त्याचप्रमाणे मूर्तीची खरेदी करताना त्यांच्या रंगांकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे. पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती खरेदी करणे चांगले मानले जाते. त्यासोबतच त्यांची सोंड डाव्या बाजूला वाकलेली असावी, अशा प्रकारची मूर्ती खरेदी करणे शुभ मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)