Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shani Nakshatra: शनि देवाची ‘ही’ नक्षत्रे, जाणून घ्या कोणती आहेत शुभ आणि पवित्र

राशी बदलण्यासोबतच शनिदेव नक्षत्र देखील बदलतात. ज्याचा परिणाम देश आणि जगासह सर्व राशींवर होतो. ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाशी संबंधित तीन नक्षत्रांचे वर्णन करण्यात आले आहे. शनिदेवाचे हे तीन नक्षत्र कोणते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 02, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शनिची नक्षत्रे कोणती
  • शुभ आणि पवित्र नक्षत्र कोणती
  • नक्षत्राचे काय आहेत वैशिष्ट्ये
 

शनिदेवाला कर्माचे फळ देणारा आणि न्यायाचा देव म्हणून ओळखला जातो. तो व्यक्तींना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला सर्वात क्रूर ग्रह मानले जाते. शनि सर्वात मंद गतीने फिरतो. तो दर अडीच वर्षांनी राशी बदलतो. ज्योतिषशास्त्रात, शनि हा दोन राशींचा स्वामी मानला जातो. मकर आणि कुंभ. त्याचप्रमाणे, शनि हा तीन नक्षत्रांचा स्वामी मानला जातो.

राशी बदलांसोबतच, शनिदेव नक्षत्र देखील बदलतात, ज्याचा परिणाम देश आणि जगासह सर्व राशींवर होतो. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाशी संबंधित तीन नक्षत्रांचे वर्णन करण्यात आले आहे. शनिदेवाचे हे तीन नक्षत्र कोणते आणि शुभ अशुभ कोणते ते जाणून घ्या

शनिचे पहिले नक्षत्र पुष्य

शनिदेवाचे पहिले नक्षत्र पुष्य आहे. हे नक्षत्र पूर्णपणे कर्क राशीत आहे. ज्योतिषशास्त्रात, हे सर्व नक्षत्रांमध्ये सर्वात शुभ आणि पवित्र मानले जाते. या नक्षत्रात जन्मलेले लोक हुशार, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ मानले जातात. या नक्षत्राखाली असलेले लोक अत्यंत धार्मिक असतात. त्यांच्यात वाढ आणि विकासाची प्रबळ क्षमता असते. ते संकटातून लवकर सावरतात. या नक्षत्रात शुभ कार्य करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो. व्यापार, गृहप्रवेश, खरेदी विक्री, नवीन कामासाठी शुभ मानला जातो.

December Shubh Muhurat: डिसेंबरमध्ये गृहप्रवेश, नामकरण समारंभासाठी काय आहेत शुभ मुहूर्त, जाणून घ्या

शनिदेवाचे दुसरे नक्षत्र अनुराधा

शनिदेवाचे दुसरे नक्षत्र अनुराधा आहे. हे नक्षत्र वृश्चिक राशीत येते. या नक्षत्राला यशाचे प्रतीक मानले जाते. या नक्षत्रात जन्मलेले लोक धाडसी, ऊर्जावान आणि प्रभावशाली असतात. या लोकांची परदेशात उत्तम प्रगती होते. त्यांची प्रबळ इच्छाशक्ती त्यांना जीवनात लक्षणीय प्रगती करण्यास मदत करते. या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे हे लोक लोकसंबंध निर्माण करण्यास कुशल असतात त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण आणि संघटनकौशल्य असते. धैर्य, चिकाटी आणि जबाबदारी असावी. हा काळ आध्यात्मिक विकासासाठी उपयुक्त असतो.

December Monthly Horoscope: डिसेंबरचा महिना सर्व राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या

शनिचे तिसरे नक्षत्र उत्तराभाद्रपद

शनिचा उत्तराभाद्रपद नक्षत्र मीन राशीमध्ये येते. हा नक्षत्र उर्जेचा नक्षत्र मानला जातो. या नक्षत्रात जन्मलेले लोक दयाळू, समृद्ध आणि आनंदी असतात. त्यांच्याकडे उल्लेखनीय आध्यात्मिक क्षमता आणि ज्ञान असते. हे नक्षत्र अंतर्मुख, तत्वनिष्ठ आणि ज्ञानुप्रेमी स्वभावाचे असते. या नक्षत्राचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या नक्षत्रात अध्यात्म आणि तत्वज्ञानाची आवड असते. शांत, गंभीर आणि विचारशील स्वभाव असतो. संकटामध्ये स्थिर राहण्याची देखील क्षमता असते. तसेच आदर, नैतिकता आणि प्रतिष्ठा देखील असते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शनि देवाच्या अधिपत्याखाली कोणती नक्षत्रे येतात

    Ans: शनि देवाच्या अधिपत्याखाली पुष्य, अनुराधा, उत्तराभाद्रपद ही तीन नक्षत्रे येतात

  • Que: या तिघांपैकी शुभ आणि पवित्र नक्षत्र कोणते

    Ans: पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ, पवित्र आणि सर्वार्थसिद्ध मानले जाते. शुभ कार्याचा आरंभ, खरेदी, गृहप्रवेश यासाठी हे नक्षत्र अत्यंत शुभ मानले जातात

  • Que: अनुराधा नक्षत्राचे शनिदेवाशी काय नाते आहे

    Ans: अनुराधा नक्षत्र हे मैत्री, संतुलन आणि यशाचे प्रतीक आहे.

Web Title: Shani nakshatra which constellations of lord shani are auspicious and sacred

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
1

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा
2

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ
3

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
4

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.