फोटो सौजन्य- pinterest
वर्षाचा शेवटच्या महिन्याची सुरुवात आजपासून झाली आहे. हा महिना धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या खूप खास मानला जातो. कारण डिसेंबरमध्ये अनेक सण आणि ग्रह संक्रमण करणार आहे. त्यापैकी सर्वांत महत्त्वाची धनु संक्रांती मानली जाते. दरम्यान डिसेंबर महिन्यामध्ये विवाहासाठी काही मुहूर्त उपलब्ध आहेत. कारण काही दिवसांनी पौष महिना सुरु होत आहे. जर तुम्ही डिसेंबरमध्ये गृहप्रवेश करण्याची योजना आखत असाल तर हा काळ चांगला आहे. तसेच नवीन व्यवसायाची सुरुवात आणि वाहन खरेदी करण्यासाठी देखील काही मुहूर्त आहे. डिसेंबरमध्ये कोणते शुभ मुहूर्त आहेत ते जाणून घ्या
डिसेंबरमध्ये महिन्यामध्ये विवाहासाठी तीन मुहूर्त आहेत. पहिला मुहूर्त गुरुवार, 4 डिसेंबर रोजी आहे. यावेळी मुहूर्त संध्याकाळी 6.40 ते सकाळी 6.59 पर्यंत आहे. तर दुसरा मुहूर्त शुक्रवार, 5 डिसेंबर रोजी सकाळी 6.59 ते सकाळी 7.00 वाजेपर्यंत आहे आणि शेवटचा तिसरा मुहूर्त शनिवार, 6 डिसेंबर रोजी सकाळी 7.00 ते सकाळी 8.48 वाजेपर्यंत असणार आहे.
डिसेंबरमध्ये महिन्यामध्ये गृहप्रवेशासाठी तीन मुहूर्त आहेत. पहिला मुहूर्त सोमवार, 1 डिसेंबर रोजी सकाळी 6.56 ते संध्याकाळी 7.1 वाजेपर्यंत आहे. तर दुसरा मुहूर्त शुक्रवार, 5 डिसेंबर रोजी सकाळी 6.59 ते सकाळी 7.1 वाजेपर्यंत आहे आणि तिसरा शेवटचा मुहूर्त शनिवार, 6 डिसेंबर रोजी सकाळी 7.00 ते सकाळी 8.48 वाजेपर्यंत आहे.
पंचांगानुसार, डिसेंबरमध्ये नामकरणासाठी शुभ दिवस 4, 8, 13, 14, 17, 22, 24 आणि 28 डिसेंबर आहेत. असे नामकरणासाठी एकूण आठ शुभ दिवस आहेत.
पंचांगानुसार, डिसेंबरमध्ये मालमत्ता खरेदी करण्यासाठी 5, 11, 18, 19 आणि 26 डिसेंबर हे शुभ दिवस आहेत. मालमत्ता खरेदी करण्यासाठी एकूण पाच शुभ दिवस आहेत.
सोन्याची खेरदी करण्यासाठी एकूण आठ शुभ दिवस आहेत
मंगळवार, 2 डिसेंबर रोजी सकाळी 7.28 ते 10.39 आणि दुपारी 12.21 ते 4.49
गुरुवार, 4 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते 10.31
शुक्रवार, 5 डिसेंबर रोजी दुपारी 1.37 ते 6.33
रविवार, 7 डिसेंबर रोजी सकाळी 8.15 ते 10.19
मंगळवार, 16 डिसेंबर रोजी सकाळी 7.40 ते दुपारी 12.54 आणि दुपारी 2.19 ते रात्री 8.4
मंगळवार, 23 डिसेंबर रोजी सकाळी 7.42 ते सकाळी 10.59 आणि दुपारी 12.26 ते दुपारी 5.22
गुरुवार, 25 डिसेंबर रोजी सकाळी 7.43 ते दुपारी 12.18 आणि दुपारी 1.43 ते संध्याकाळी 7.29
शुक्रवार, 26 डिसेंबर रोजी सकाळी 7.43 ते सकाळी 10.47
पंचांगानुसार डिसेंबरमध्ये 19 डिसेंबरपासून पौष महिन्याची सुरुवात होत आहे. यावेळी सूर्य धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे. पौष महिना जानेवारीमध्ये संपणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, पौष महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या कारणास्तव, पौषदरम्यान लग्न, नामकरण आणि गृहप्रवेश करणे इत्यादी शुभ कार्ये केली जात नाही.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: डिसेंबर महिन्यात गृहप्रवेशासाठी काही महिने शुभ आहेत. यावेळी तिथी, नक्षत्र आणि वार यानुसार जातात. मार्गशीर्ष आणि पौष या महिन्यात गृहप्रवेशासाठी शुभ योग उत्तम असतात
Ans: शुभ मुहूर्तावर केलेले कार्य यश, समृद्धी आणि सकारात्मक परिणाम देणारे मानले जाते.
Ans: गणपती बाप्पा आणि इष्टदेवतेची पूजा केली जाते. बालकाच्या कुंडलीनुसार देवता पूजनही केले जाते






