फोटो सौजन्य- pinterest
डिसेंबर महिन्याची आजपासून सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच दिवशी मोक्षदा एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे. या महिन्यात अनेक व्रत वैकल्य आहेत. हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप खास आहे. काही दिवसांनी मार्गशीर्ष संपून पौष सुरू होणार आहे. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी हा महिना मिश्रित राहणार आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला तुम्हाला कामानिमित मानसिक तणाव जाणवू शकतो. नोकरीमध्ये बदल करू इच्छित असाल तर हा महिना खूप चांगला आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी सर्वांकडून सहकार्य मिळेल.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना चढ उताराचा राहील. या महिन्यात तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला या महिन्यात आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायामध्ये कोणतीही गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा महिना समस्यांनी भरलेला राहील. घाईमध्ये कोणतेही काम करू नका.
मिथुन राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना चांगला राहील. मात्र या महिन्यात तुम्हाला आळस करणे टाळावे लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा आदर वाढेल. मालमत्तेसंबंबंधित कोणतेही वाद सुरू असतील तर ते दूर होतील.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना मिश्रित राहील. या महिन्यात तुम्हाला अनेक बदलांना सामोरे जावे लागते. नोकरी करत असणाऱ्या लोकांवर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. नको असलेल्या ठिकाणी बदली देखील होऊ शकते त्यामुळे नोकरी करणाऱ्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. डिसेंबरमध्ये कोणतेही काम करताना घाई करणे टाळावे. वाहन चालवताना काळजी घ्या अन्यथा आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप शुभ असणार आहे. तुमच्या करिअर आणि व्यवसायापासून ते तुमच्या कुटुंबापर्यंत सर्व काही तुमच्या इच्छेनुसार जाईल. जर तुम्ही व्यवसायात गुंतलेले असाल आणि नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल किंवा नवीन व्यवसाय जागा भाड्याने घेण्याची किंवा खरेदी करण्याची योजना आखत असाल तर या महिन्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. डिसेंबर महिना भागीदारी करणाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर राहील.
कन्या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना खूप मिश्रित राहणार आहे. या महिन्यात तुम्हाला विविध आव्हानांना तोंड द्यावे लागेल. कन्या राशीच्या लोकांना त्यांची ऊर्जा, वेळ आणि पैसा काळजीपूर्वक व्यवस्थापित करावा लागेल. महिन्याच्या सुरुवातीला काही अनपेक्षित मोठे खर्च उद्भवू शकतात त्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी. या काळात करिअर आणि व्यवसायामध्ये संधी अनुकूल राहील.
तूळ राशीच्या लोकांसाठी हा महिना धावपळीचा राहील. तुमची नियोजित कामे इच्छेनुसार पूर्ण होण्याची शक्यता आहे, परंतु त्यासाठी थोडे अधिक प्रयत्न आणि कठोर परिश्रम करावे लागू शकतात. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला व्यवसायात चांगला फायदा होईल. या महिन्यात तुमच्या खर्चामध्ये वाढ होईल. जमीन आणि इमारती खरेदी किंवा विक्रीवर किंवा त्यांच्या देखभालीवर पैसा खर्च होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना चांगला राहणार आहे. तुमच्या करिअर आणि व्यवसायासाठी हा महिना अनुकूल राहील. तुम्हाला व्यवसायामध्ये अपेक्षित फायदा होईल. व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. तुम्ही एखादा मोठा व्यवसाय करार पूर्ण करू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. कामावर पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या प्रतिष्ठित संस्थेकडून चांगली ऑफर तुमच्याकडे येऊ शकते.
धनु राशीच्या लोकांसाठी हा महिना चांगला असणार आहे. तुम्ही घेतलेल्या मेहनतीला अपेक्षित यश मिळेल. महिन्याच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला थोडी धावपळ करावी लागेल. सरकारशी जोडलेल्या लोकांशी संपर्क स्थापित कराल, ज्यांच्या मदतीने तुमचे रखडलेले काम जलद गतीने पूर्ण होईल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा महिना खूप चांगला राहणार आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमच्या वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळेल.पदोन्नतीची शक्यता आहे.
मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र राहणार आहे. तुम्हाला कोणत्याही कामात खूप काळजी घ्यावी लागेल आणि वेळेवर काम करावे लागेल, अन्यथा प्रगतीपथावर असलेले काम देखील वाया जाऊ शकते. डिसेंबरच्या सुरुवातीला, कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य आणि पाठिंबा न मिळाल्याने तुम्हाला दुःख होईल. या महिन्यात व्यावसायिकांना फायदा होईल. आर्थिक समस्या जाणवू शकतात.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना धावपळीचा राहील. नियोजित काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी आणि इच्छित यश आणि फायदा मिळविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागू शकते. खूप मेहनत घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही परदेशात काम करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर या महिन्यात तुम्हाला खूप फायदे होऊ शकतात.
मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप चांगला राहणार आहे. या महिन्यात तुम्हाला थोडी धावपळ करावी लागू शकते आणि खर्च देखील होऊ शकतो. घरातील फर्निचर किंवा लक्झरी वस्तूची देखील तुम्ही खरेदी करु शकता. व्यवसाय वाढवण्यासाठी मोठी भांडवल खर्च करू शकता. तुम्हाला मागील गुंतवणुकीतून लक्षणीय परतावा मिळण्याची शक्यता आहे. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या लोकांना या महिन्यात आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






