फोटो सौजन्य- pinterest
दरवर्षी आश्विन शुक्ल पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमेचा पवित्र सण साजरा केला जातो. शरद पौर्णिमेला लोक सकाळी उपवास करतात आणि पूजा करतात, तर रात्री ते चंद्राला प्रार्थना करतात आणि खीर तयार करुन ती चंद्रप्रकाशात ठेवतात. मात्र यावेळी शरद पौर्णिमेच्या वेळी भद्रा आहे. भद्रादरम्यान कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. ही भद्रा पृथ्वीवर राहते, म्हणून त्याचा प्रभाव जास्त असेल. भद्राच्या काळात शुभ कार्य केल्याने अडथळा येऊ शकतो आणि त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. शरद पौर्णिमेला भद्राच्या काळात रात्री खीर कशी जतन करावी? जाणून घ्या ज्योतिषीय उपाय
शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. यावेळी शरद पौर्णिमा सोमवार, 6 ऑक्टोबर रोजी आहे. पंचांगानुसार आश्विन शुक्ल पौर्णिमेच्या तिथीची सुरुवात सोमवार, 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.23 ते मंगळवार, 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.16 पर्यंत आहे. त्यामुळे अश्विन पौर्णिमा सोमवार, 6 ऑक्टोबर रोजी रात्री साजरी केली जाणार आहे.
शरद पौर्णिमेला भद्रा आहे. त्या दिवशी दुपारी 12.33 वाजता भद्राची सुरूवात होईल आणि रात्री 10.53 वाजता भद्राचा कालावधी संपेल. जर तुम्हाला शरद पौर्णिमेला कोणतेही शुभ कार्य करायचे असल्यास तुम्ही ते भद्रा शुक्ल सुरू होण्यापूर्वी करावे. परंतु यामध्येही तुम्हाला राहुकाल लक्षात ठेवावे लागेल.
या दिवशी राहू काल सकाळी 7.45 ते 9.13 पर्यंत असेल. राहुकाल देखील अशुभ मानला जातो. दरम्यान, कालसर्प दोषाचे उपाय या काळात केले जातात. या दिवशी वृद्धी योग दुपारी 1.14 पर्यंत राहील. या योगात तुम्ही केलेले कोणतेही शुभ कार्य त्याचे फळ वाढवेल.
भद्राच्या कालावधीमध्ये कोणतेही शुभ कार्य करु नये, असे म्हटले जाते. कारण त्याचे अशुभ परिणाम होतात. भद्राच्या कालावधीमध्ये चंद्राला खिरीचा नैवेद्य दाखवू नये भद्रा संपल्यानंतर तुम्ही ते दाखवू शकता. दरम्यान, तुम्ही शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशात रात्रभर खीर साठवून ठेवू शकता आणि सकाळी ती खाऊ शकता. खीर अशा प्रकारे ठेवा की चंद्रप्रकाश त्यावर चमकत राहील.
शरद पौर्णिमेला खाल्लेली खीर आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. त्यामुळे आरोग्याला खूप फायदे होतात, असे मानले जाते. अशी देखील मान्यता आहे की, शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांवर अमृत वर्षाव होतो. ज्यावेळी ही किरणे खिरीवर पडतात त्यावेळी त्यामध्ये औषधी गुणधर्म तयार होतात, असे म्हटले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)