फोटो सौजन्य- pinterest
आज नवरात्रीचा सहावा दिवस आणि आश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षातील पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा करण्याची परंपरा आहे. आज सकाळी 6.12 वाजता रवियोग तयार झाला आहे. या काळात देवीची पूजा करणे शुभ मानले जाते. स्कंदमातेचे हे रुप नवरात्रीमध्ये पाचव्या स्थानी आहे. स्कंदमाता म्हणजे स्कंदकुमारची आई. भगवान कार्तिकेय यांना स्कंद असेही म्हणतात. ज्यावेळी कार्तिकेयांचा जन्म झाला त्यावेळेपासून देवी पार्वतीला स्कंदमाता म्हणून देखील ओळखले जाऊ लागले. नवरात्रीच्या काळात, दुर्गा देवीसोबत भगवान कार्तिकेय आणि भगवान गणेश यांची पूजा केली जाते. स्कंदमातेची पूजा करणाऱ्यांवर देवी नेहमी प्रेम आणि करुणेचा वर्षाव करते. नऊ दुर्गांपैकी स्कंदमाता सर्वात प्रेमळ आहे. जे लोक विहित विधींनुसार स्कंदमातेची पूजा करतात त्यांना संतती प्राप्त होते, अशी मान्यता आहे. ज्यांना मुले आहेत ते आनंदी आणि सुरक्षित राहतील. आज दिवसभर प्रीती योग आणि अनुराधा नक्षत्र प्रभावी आहेत. स्कंदमाता देवीची पूजा करण्याची पद्धत, मंत्र आणि नैवेद्य याबद्दल जाणून घ्या
ज्यांना रवि योगामध्ये देवीची पूजा करता आली नाही अशा लोकांनी सकाळी 7.42 वाजता ही पूजा करावी. ही पूजा करण्यासाठी शुभ वेळ 7.42 ते 9.12 अशी आहे. आज पूजा करण्यासाठी अभिजित मुहूर्त सकाळी 11.48 ते दुपारी 12.36 पर्यंत आहे.
स्कंदमातेचे रूप भव्य आणि प्रेमळ आहे. ही देवी सिंहावर स्वार झालेली आहे. तर तिला चार हात आहे. तिने सहामुखी स्कंदकुमाराला आपल्या मांडीवर धरले आहे. तिच्या हातात कमळाची फुले आहेत. एका हातात स्कंदकुमार आहे, तर दुसऱ्या हातात वरदमुद्रा आहे.
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी जे लोक स्कंदमातेची पूजा करतात त्यांना संतती प्राप्त होते, असे म्हटले जाते. तसेच निपुत्रिक लोकांना स्कंदमातेची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो. तिच्या कृपेने त्यांना संतती प्राप्त होऊ शकते.
मान्यतेनुसार, जे भक्त स्कंदमातेची पूजा करतात त्यांना संतती प्राप्त होते. त्यांची मुले आनंदी आणि सुरक्षित असतात.
स्कंदमातेच्या भक्तांचे पाप नष्ट होतात, त्यांना जीवनाच्या शेवटी मोक्ष मिळतो, त्यांना जीवन आणि मृत्युच्या चक्रातून मुक्तता मिळते.
या देवीच्या आशीर्वादाने मूर्खही ज्ञानी होतात.
त्याचबरोबर कामात यश, दुःख आणि समस्येपासून सुटका आणि सुख-समृद्धी मिळविण्यासाठी स्कंदमातेची पूजा करावी.
स्कंदमाता तिच्या भक्तांना त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करते. ती त्यांना इच्छित वरदान देते.
सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर स्कंदमातेला गंगाजलाने स्नान घाला आणि तिचे कपडे, फुले, माला, सिंदूर आणि इतर नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर लाल जांभळा रंगांचे फूल, धान्य, कुंकू, धूप, दिवे, फळे आणि नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर देवीच्या मंत्रांचा जप करा. तसेच देवीला केळी किंवा मिठाई अर्पण करा. गाईच्या तुपाने भरलेल्या दिव्याने स्कंदमातेची आरती करा. जर तूप नसल्यास तीळ किंवा मोहरीचे तेल वापरा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)