फोटो सौजन्य- pinterest
आज सोमवार, 29 सप्टेंबर रोजी देवीचा सातवा दिवस आहे. यावेळी देवीच्या सातव्या रुपाची म्हणजे कालरात्री देवीची पूजा केली जाते. या तिथीला महासप्तमी असेही म्हणतात. या देवीचे रुप भयानक असले तरी, ही देवी भक्तांसाठी खूप शुभ आणि फायदेशीर आहे. असे मानले जाते की, कालरात्री देवीची विधिवपूर्वक पूजा करुन तिचे आवडते पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व त्रास आणि भीती दूर होते. तसेच भक्तांना सुख समृद्धी प्राप्त होते. कालरात्री देवीला कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात, जाणून घ्या
देवी कालरात्री ही दुर्गेची सर्वात भयंकर आणि शक्तिशाली रूप मानली जाते. तिचा रंग रात्रीच्या अंधारासारखा काळा आहे, तिचे केस विस्कटलेले आहेत आणि तिला तीन मोठे डोळे आहेत. ही देवी गाढवावर स्वार असलेली आहे आणि तिचे चार हात आहेत. एकाच्या हातात तलवार आहे, तर दुसऱ्याच्या हातात लोखंडी काटा आहे, तर इतर दोन हातात आशीर्वाद आणि भक्तांसाठी अभय मुद्रेचे मुद्रे आहेत. देवीच्या नावाचा अर्थ असा होतो की, काल” म्हणजे मृत्यू आणि “रात्री” म्हणजे अंधार, जो ती नष्ट करते. त्यामुळे या देवीची पूजा केल्याने भीती, अपघात आणि नकारात्मक शक्ती नष्ट होण्यास मदत होते.
सप्तमी तिथीची सुरुवात रविवार, 28 सप्टेंबर रोजी दुपारी 2.27 वाजता झाली आहे आणि या तिथीची समाप्ती सोमवार, 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4.31 मिनिटांनी होणार आहे. तर यावेळी अभिजित मुहूर्त सकाळी 11 वाजून 47 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 35 मिनिटांपर्यंत आहे.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी देवीला गूळ, पुरी इत्यादी गोष्टीचा नैवेद्य दाखवल्याने देवी प्रसन्न होते आणि नकारात्मक शक्तींपासून तुमचे रक्षण करते.
देवी कालरात्रीला गूळ आणि गुळापासून बनवलेले पदार्थ खूप आवडतात त्यामुळे देवीला सप्तमीच्या दिवशी या वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते.
कालरात्री देवीला गूळ अर्पण केल्याने ती लवकर प्रसन्न होते. असे म्हटले जाते की, या गोष्टी अर्पण केल्यामुळे भक्तांच्या जीवनातील दुःख दूर होते.
तुम्ही गुळापासून बनवलेले मालपुआ किंवा गुळाची खीर देवीला अर्पण करता येते. असे केल्याने भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असे म्हटले जाते.
गुळासोबत हरभरा अर्पण करणेदेखील देवी कालरात्रीला खूप प्रिय आहे. हा नैवेद्य दाखवल्याने आत्मविश्वास, धैर्य आणि शक्ती मिळते.
अनेक ठिकाणी देवी कालरात्रीला मध अर्पण करण्याची परंपरा आहे. मध अर्पण केल्याने जीवनात गोडवा, समृद्धी आणि शांती येते.
सप्तमीच्या दिवशी देवीची पूजा करण्यापूर्वी स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर देवीची मूर्ती किंवा चित्रांची स्थापना करुन घ्या आणि देवीला गंगाजलाने स्नान घाला. त्यानंतर देवीला लाल किंवा नारंगी रंगांचे वस्त्र अर्पण करा. रोली, कुंकू, तांदळाचे दाणे, लाल आणि पिवळी फुले, अगरबती आणि दिवा देवीला अर्पण करा. देवीला तिचा आवडता पदार्थ गूळ आणि हरभरा अर्पण करा. तसेच देवी समोर तुपाचा दिवा लावून ओम देवी कालरात्रिये नमः या मंत्रांचा जप करावा. सर्वांत शेवटी कुटुंबासोबत देवीची आरती करावी.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)