फोटो सौजन्य- pinterest
देशभरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी देवीच्या 9 रुपांची पूजा केली जाते. देवीच्या पूजेवेळी लवंगाचा वापर केल्याने व्यक्तीला जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. या उपायांमुळे देवीची भक्तांवर कृपा राहते आणि सर्व स्वप्ने आणि अपूर्ण कामे एक-एक करून पूर्ण होतात. जर तुम्ही नवरात्र संपण्यापूर्वी हे विधी केल्यास तुमचे भाग्य बदलू शकते आणि तुमच्या घरात सुख-शांती, संपत्ती आणि समृद्धी येऊ शकते. नवरात्र संपण्यापूर्वी लवंगाचे कोणते उपाय करायचे जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार, महासप्तमी, महाअष्टमी किंवा नवरात्रीच्या महानवमीच्या रात्री देवीच्या समोर तुपाचा दिवा लावून त्यामध्ये दोन लवंगा टाका. हा उपाय केल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो आणि नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकते. तसेच मुख्य दरवाजाजवळ देखील दिवा लावावा. त्यात दोन लवंग टाकावे त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी एक पिवळ्या रंगांचे कापड घ्या आणि त्यात एक जोडी लवंग, पाच हिरव्या वेलची आणि पाच सुपारी ठेवून त्याची गाठ बांधा. महासप्तमी, महाअष्टमी किंवा महानवमीला देवीसमोर हे गठ्ठा ठेवा आणि देवीसोबत त्याची पूजा करा. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता म्हणजे कपाट किंवा तिजोरी त्यामध्ये ते ठेवा. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रयत्नामध्ये अपेक्षित यश मिळेल.
जर कुटुंबातील एखाद्या सदस्याला वाईट नजर लागली असल्यास काळ्या रंगांच्या कापड्यामध्ये लवंग बांधा आणि ती व्यक्तीजवळ ठेवा. असे केल्याने, देवी सर्व वाईट गोष्टी दूर करेल आणि त्यांच्याभोवती एक शक्तिशाली ऊर्जा निर्माण करेल. तसेच देवीला रोज लवंग आणि गूळ अर्पण करा. यामुळे ग्रहदोष शांत होतात आणि कौटुंबिक वाद संपतात.
वैवाहिक जीवनात सुख आणि शांती मिळवण्यासाठी पती-पत्नीने नवरात्रीच्या कोणत्याही रात्री दुर्गा देवीच्या समोर लवंग आणि मधाचा दिवा लावावा, यामुळे नात्यात गोडवा आणि परस्पर समजूतदारपणा वाढतो. तसेच तुमच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीच्या समोर रोज लवंगाचा दिवा लावण्याने त्या पूर्ण होतात.
करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी नवरात्रीमधील महासप्तमी, महाअष्टमी किंवा महानवमीच्या दिवशी लवंगाची जोडी घ्या आणि ती तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा फिरवा. यानंतर लवंगाची जोडी देवीच्या चरणी अर्पण करा. असे केल्याने बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि आधीच नोकरी करणाऱ्यांना चांगल्या नवीन नोकरीच्या ऑफर मिळतील. वरिष्ठ आणि सहकाऱ्यांशी असलेले संबंधही दृढ होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शदेशभरात नवरात्रीचा कत नाही.)