फोटो सौजन्य- pinterest
नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीची पूजा फुलांच्या हारांनी केली जाते. यावेळी जास्वंदाची जास्त फुले जास्त महत्त्वाची मानली जाते. असे मानले जाते की, देवीच्या फुलांमध्ये लाल फुलांचा समावेश केल्याने त्याचे शुभ परिणाम मिळतात. तसेच देवीचा भक्तांवर आशीर्वाद राहतो. तुम्ही या काळामध्ये उपवास करुन देवीच्या 9 रुपांची पूजा केली जाते. जर नवरात्रीमध्ये जास्वंदाच्या फुलाचे उपाय केल्यास व्यक्तीच्या जीवनामध्ये समृद्धी येते आणि धन आणि धान्याची कमतरता देखील दूर होते. नवरात्रीमध्ये जास्वंदाच्या फुलांचे उपाय कसे करायचे, जाणून घ्या
नवरात्रीमध्ये देवीची पूजा करताना तिला लाल जास्वंद फुले अर्पण करावे आणि विहित विधींनुसार तिची पूजा आणि आरती करावी. जर तुम्ही हा उपाय भक्तीने केला तर तुमच्या जीवनातून नकारात्मकता दूर होऊ शकते आणि तुमच्या घरात आनंद आणि समृद्धीचा प्रवाह येऊ शकतो. लाल रंग हा देवीला खूप प्रिय आहे. ही फुले देवीला अर्पण केल्याने भक्तावर देवीचा आशीर्वाद राहतो.
नवरात्रीच्या दिवसात सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यानंतर पिवळे किंवा लाल रंगांचे कपडे परिधान करुन देवीची पूजा करावी. पूजा करताना ओम ऐम ह्रीम कलीम चामुंडये विच्छे या मंत्रांचा जप करावा. यावेळी 108 वेळा जप करणे सर्वोत्कृष्ट मानले जाते. असे केल्याने साधकाची आर्थिक अडचणीतून सुटका होईल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
नवरात्रीच्या दिवसामध्ये पूजा करा आणि देवीला दररोज लाल रंगांचे जास्वंदाचे फूल अर्पण करा. यावेळी मानसिकरित्या देवीला तुमच्या इच्छा व्यक्त करा आणि दशमी तिथीच्या दिवशी देवीला अर्पण केलेली फुले वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या. त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि तुम्हाला आशीर्वाद मिळतील.
नवरात्रीमध्ये दुपारच्या वेळी अर्धवट फुललेले जास्वंदाचे फूल आणा आणि ते देवी कालीला प्रसाद म्हणून अर्पण करा. पूजा झाल्यानंतर घरातील ज्या सदस्याला नकारात्मक उर्जेचा त्रास होत आहे त्याला हे फूल खायला घाला. हा उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते आणि जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. जास्वंदाच्या फुलाचे हे उपाय केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)