फोटो सौजन्य- pinterest
नवरात्रीमध्ये भक्त नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांची पूजा करतात आणि दररोज विविध प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो. शास्त्रांमध्ये म्हटल्याप्रमाणे देवीला फळे अर्पण केल्याने भक्ताचे पाप नष्ट होतात, इच्छा पूर्ण होतात आणि कुटुंबावर नेहमीच देवीचा आशीर्वाद राहतो. खासकरुन नवरात्रीमध्ये या 3 फळांचा नैवेद्य दाखवणे खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, ही फळ देवीला अर्पण केली तर देवी प्रसन्न होते.
नवरात्रीचा हा उत्सव देवीला समर्पित आहे. या नऊ दिवसांत देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाते आणि भक्त या काळात उपवास देखील करतात. देवीला प्रसन्न करण्यासाठी नैवेद्याला देखील विशेष महत्त्व आहे. यावेळी देवीला फळ, फूल आणि नैवेद्य दाखवल्याने घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते. नवरात्रीच्या काळामध्ये देवीला ही फळे अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. नवरात्रीमध्ये देवीला कोणती फळे अर्पण करावीत, जाणून घ्या
डाळिंब हे देवीचे खूप आवडते फळ मानले जाते. हे फळ आनंद, समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते. यामुळे तुम्हाला जीवनामध्ये आनंद, समृद्धी मिळते. तसेच हे फळ अर्पण केल्याने घरामध्ये आनंद येतो त्यासोबतच मुलांचे कल्याण देखील होते. असे मानले जाते की डाळिंब अर्पण केल्याने भक्ताला असलेल्या आजारांतून त्याची सुटका होते आणि दीर्घायुष्याचे आशीर्वाद मिळतात.
नारळ हे एक शुभ फळ मानले जाते. देवीला हे फळ अर्पण केल्याने भक्ताचे पाप शुद्ध होते आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. नवरात्रीत नारळ अर्पण केल्याने व्यक्तीमधील शक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक धार्मिक विधीमध्ये नारळाला विशेष स्थान आहे.
केळी हे स्थिरता आणि सौभाग्याचे फळ मानले जाते. नवरात्रीच्या काळात देवीला केळी अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये स्थैर्य येते आणि संपत्तीमध्ये वाढ होते, असे म्हटले जाते. असे मानले जाते की, हे फळ देवी लक्ष्मीला देखील प्रिय आहे, त्यामुळे नवरात्रोत्सवात हे फळ अर्पण केल्याने देवीचा भक्तांवर आशीर्वाद राहतो.
नवरात्रीत जर डाळिंब, नारळ आणि केळी ही तीन फळे भक्तीभावाने देवीला अर्पण केल्यास भक्ताला देवीचे विशेष आशीर्वाद मिळतात, अशी मान्यता आहे. या फळांना फक्त धार्मिकदृष्ट्याच महत्त्व नसून ते व्यक्तीच्या जीवनामध्ये समृद्धी, शक्ती आणि सौभाग्यही आणतात, असे देखील म्हटले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)