फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचा सण खूप शुभ मानला जातो. यावेळी नवरात्रीची सुरुवात आज 22 सप्टेंबर रोजी होत आहे. या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. शैलपुत्री देवी ही पर्वतराजा हिमालयाच्या राज्याची मुलगी आहे ती पहिल्या वर्ष झालेली आहे. तिच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ डाव्या हातात कमळ आहे. असे मानले जाते की या देवीची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये धैर्य आणि पवित्रतेची भावना उत्पन्न होते. त्यासोबतच त्या व्यक्तीवर असलेले कर्ज दूर होते देवीची त्या व्यक्तींवर विशेष आशीर्वाद राहतो. पहिल्या दिवशी पूजेच्या वेळी रंग, नैवेद्य, मंत्र आणि कथेला विशेष महत्त्व आहे. जाणून घ्या शैला कुठली देवीची पूजा करण्याची पद्धत आणि मंत्र
नवरात्रीची पहिली पूजा सकाळी ब्रह्म मुहूर्तावर म्हणजेच लवकर उठून केली पाहिजे असे म्हटले जाते. आंघोळ झाल्यानंतर हलक्या रंगाचे कपडे परिधान करावे.
घरातील देव्हारा गंगाजल शिंपडून स्वच्छ करून घ्यावा. त्यानंतर एक चौरंग घेऊन त्यावर शैलपुत्री देवी मूर्ती स्थापित करावी.
पूजेची सुरुवात कलश स्थापनेने करावी. हे नवरात्रीचे मुख्य अंग आहे. कुटुंबातील सर्व सदस्य मिळून विधीपूर्वक या कलशाची स्थापना करावी.
देवीचे ध्यान करा आणि ओम देवी शैलपुत्र्यै नमः या मंत्राचा जप करा त्यासोबतच
वंदे वाञ्छितलाभाय चंद्रार्धकृतशेखराम्।
वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्॥ या मंत्राचा देखील जप करावा.
देवी शैलपुत्रीची पूजा पारंपारिक पद्धतीने विधीपूर्वक करावी. यामध्ये पाणी, तांदूळ, फुल, धूप, दिवा, गंध आणि नैवेद्य या गोष्टींचा समावेश असावा.
पूजा करतेवेळी देवीला पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे फुल अर्पण करावे. त्यासोबतच कुंकू लावून तिची पूजा करावी.
देवीच्या समोर धूप लावावे आणि तुपाचा दिवा लावावा. असे मानले जाते की पाच दिवे लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांती येते. पूजा झाल्यानंतर देवीची आरती करून घ्यावी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीला प्रसन्न करण्यासाठी शुद्ध आणि सात्विक नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की देवीला शुद्ध तुपापासून बनवलेली खीर खूप आवडते. याव्यतिरिक्त तुम्ही देवीला पांढऱ्या रंगाची मिठाईचा नैवेद्य दाखवू शकता. पूजा झाल्यानंतर देवीचा प्रसाद कुटुंबामध्ये वाटावा. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती राहते.
शैलपुत्री देवीचे ध्यान आणि जप केल्याने मनाला शांती आणि शक्ती प्राप्त होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या मंत्राचा जप करणे खूप फायदेशीर ठरते.
या देवी सर्वभूतेषु शैलपुत्री रुपेण संस्थिता
नमस्तत्स्यै नमस्तत्स्यै नमस्तत्स्यै नमो नमः.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)