Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shravan 2025: श्रावण महिन्यातील भगवान शिवाचा आवडता रंग कोणता? जाणून घ्या यामागील धार्मिक महत्त्व

श्रावण महिना हा व्रत वैकल्यासाठी खूप शुभ मानला जातो. या महिन्यामध्ये उपवास, पूजा, रुद्राभिषेक आणि विशेष विधी करून भगवान शिवांना प्रसन्न केले जाते. भगवान शिवाचे आवडते रंग कोणते आणि त्याचे धार्मिक महत्त्व, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 14, 2025 | 11:02 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्याचे महत्त्व हे भगवान शिवाच्या उपासनेसोबत आणि भक्तीसाठी विशेष आहे. हा महिना भगवान शिवाला समर्पित असल्याने या काळामध्ये भक्त विविध प्रकारे त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. पूजा, उपवास आणि जलाभिषेक सोबतच यावेळी रंगांनाही विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव यांचे आवडते रंग कोणते आणि या रंगामागील धार्मिक महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.

भगवान शिवाचे आवडते रंग

हिरवा रंग

हिरवा रंग हा निसर्ग, हिरवळ वाढ आणि प्रजनन क्षमता यांचे प्रतीक आहे. श्रावन महिन्यात पावसाळा असल्याने जेव्हा निसर्ग त्याच्या शिखरावर असतो. हा रंग भगवान शिवाचे नैसर्गिक स्वरूप आणि सृष्टीचे पालनपोषण करण्याची भूमिका दर्शवितो.

पौराणिक कथेमध्ये म्हटल्याप्रमाणे समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा विष बाहेर पडले तेव्हा भगवान शिव यांनी ते आपल्या घशात धरले, ज्यामुळे त्यांचा घसा निळा झाला. मात्र या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी हिरव्या रंगांच्या औषधी वनस्पती वापरल्या गेल्या होत्या, असे म्हटले गेले आहे.

Chandra Gochar: चंद्र धनु राशीमध्ये करत आहे संक्रमण, या राशीच्या लोकांना होतील फायदे

पांढरा रंग

सनातन धर्मामध्ये भगवान शिवाचा संबंध पांढऱ्या रंगांशी जोडला गेलेला आहे. हा रंग भगवान शिवाला खूप प्रिय असल्याचे म्हटले जाते. पांढऱ्या रंगांला पवित्रता, स्वच्छता, शांती आणि साधेपणाचे प्रतीक मानले जाते. भगवान शिव हे एक संन्यासी आणि तपस्वी मानले जातात, जे भ्रम आणि आसक्तीपलीकडे आहेत. पांढरा रंग त्यांच्या या रूपाचे प्रतिबिंब आहे. भगवान शिवाच्या शरीरावर भस्म लावले जाते ते राखेचे शुद्ध रूप आहे. याला जगाच्या नश्वरतेचे आणि अनासक्तीचे प्रतीक देखील मानले जाते.

लाल रंग

लाल रंग हा ऊर्जा, शक्ती, धैर्य आणि उत्साहाचे प्रतीक मानले जाते. भगवान शिव यांना वाईटाचा नाश करणारा आणि संहारक म्हणून देखील त्याची ओळख आहे. त्यामुळे विवाहित महिलांनी श्रावण महिन्यामध्ये लाल रंगांचे कपडे परिधान करावे. तसेच या रंगाला सौभाग्याचे प्रतीक देखील मानले जाते.

Astro Tips: तुमच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती अनुकूल ठेवण्यासाठी केशराचे करा ‘हे’ उपाय, मिळेल संपत्ती आणि समृद्धी

पिवळा रंग

पिवळा रंग हा ज्ञान, बुद्धी, शुभ आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. तसेच भगवान शिवाला आदिगुरु देखील मानले जाते. पिवळ्या रंगाचा संबंध देवी पार्वतीशी आहे. त्यामुळे शिव आणि पार्वती यांच्या एकत्रितपणे पूजा करताना पिवळ्या रंगांचे विशेष महत्त्व आहे.

श्रावण महिन्यातील रंगांचे महत्त्व आणि धार्मिक फायदे

श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाच्या पूजेत रंगांचा वापर केवळ सौंदर्यासाठीच नाही तर त्यांच्या खोल धार्मिक महत्त्वामुळे केला जातो. वेगवेगळे रंग त्यांच्या वेगवेगळ्या ऊर्जा आणि गुणांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे या रंगांच्या वापरामुळे भगवान शिवाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी केला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shravan 2025 what is the religious significance of lord shiva favorite color

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions
  • Shravan 2025

संबंधित बातम्या

Tembe Swami Maharaj: आज टेंबे स्वामी महाराजांची पुण्यतिथी, जाणून घेऊया त्यांचे जीवनचरित्र, शिकवण आणि महासमाधी
1

Tembe Swami Maharaj: आज टेंबे स्वामी महाराजांची पुण्यतिथी, जाणून घेऊया त्यांचे जीवनचरित्र, शिकवण आणि महासमाधी

Sant Bhagubai: विठ्ठलभक्त संत भागूबाईंचे जीवन, अभंग आणि वारकरी परंपरेतील योगदान
2

Sant Bhagubai: विठ्ठलभक्त संत भागूबाईंचे जीवन, अभंग आणि वारकरी परंपरेतील योगदान

Vitthal Katha: पंढरपुरात विठ्ठलाचे आगमन, कसे पडले नाव? जाणून घ्या कथा
3

Vitthal Katha: पंढरपुरात विठ्ठलाचे आगमन, कसे पडले नाव? जाणून घ्या कथा

zodiac sign: गजकेसरी आणि गजलक्ष्मी योगाचा या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा
4

zodiac sign: गजकेसरी आणि गजलक्ष्मी योगाचा या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.