फोटो सौजन्य- pinterest
आज सकाळी धनु राशीमध्ये चंद्राने प्रवेश करुन पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये आपले संक्रमण केलेले आहे. त्याचे हे संक्रमण उद्या म्हणजे 11 जुलै रोजी दुपारपर्यंत राहणार आहे. याआधी चंद्र वृश्चिक राशीमध्ये म्हणजे त्याच्या मूळ राशीमध्ये होता. ज्योतिषशास्त्राच्या मते चंद्र हा मन, विचार, भावना आणि मानसिक स्थितीचा कारक आहे. त्याची हालचाल आणि संक्रमण थेट आपल्या भावना आणि जीवन परिस्थितीवर परिणाम करते. पूर्वाषाढा नक्षत्रामुळे सौंदर्य, प्रेम आणि सौहार्दाचे प्रतीक असलेल्या शुक्र ग्रहाचे राज्य असते. ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या पाहिले गेल्यास हे संक्रमण खूप फायदेशीर मानले जाते.
या संक्रमणाचा काही राशीच्या लोकांवर शुभ तर काही राशीच्या लोकांवर अशुभ परिणाम होताना दिसतो. त्यामुळे या राशीच्या लोकांना मानसिक ताण, आर्थिक अडचण इत्यादी गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. त्यासोबतच कुटुंबामध्ये आनंदाचे, शांतीचे वातावरण राहते. कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या
कर्क राशीच्या लोकांसाठी चंद्राचे हे संक्रमण खूप फायदेशीर राहणार आहे. जेव्हा चंद्र नक्षत्रामध्ये संक्रमण करतो त्यावेळी त्याचा परिणाम व्यक्तीचा स्वभाव आणि कौटुंबिक वातावरणावर होताना दिसून येतो. पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये संक्रमण केल्याने त्याचा शुक्राशी संबंध असल्याचे मानले जाते. तुमचे कोणतेही जुने वाद मिटू शकतात. जे लोक सरकारी नोकरीची तयारी करत आहे अशा लोकांना यश मिळू शकते. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांची कामाच्या ठिकाणी प्रशंसा होऊ शकते. या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला राहून मानसिक ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. चंद्राच्या संक्रमणाचा सकारात्मक परिणाम तुम्हाला आत्मनिरीक्षण आणि स्पष्टतेकडे घेऊन जाईल. जे लोक मानसिक गोंधळाचा सामना करत आहे ते दूर होईल. जे लोक गुंतवणूक करत असेल त्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तसेच या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. जर तुमचे जोडीदारासोबत मतभेद असतील तर ते दूर होण्यास मदत होईल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ नवी संधीनी भरलेला असेल. चंद्राच्या संक्रमणाचा प्रभावामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात नवीनता आणेल. जे लोक नोकरीच्या नवीन प्रकल्पावर काम करत आहे अशा लोकांना नवीन संधी मिळू शकतील. एखाद्या वरिष्ठ व्यक्तींकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकते. घरगुती जबाबदाऱ्या पेलण्यासाठी संयमाची आवश्यकता असेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)