फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रात कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती स्थिर आणि योग्य दिशेने ठेवण्यासाठी घरगुती वापरातील पदार्थाचे काही उपाय सांगण्यात आलेले आहे. स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या मसाल्याचा वापर आपण ग्रहांची स्थिती स्थिर करण्यासाठी करु शकतो त्यापैकी एक म्हणजे केशर होय.
बऱ्याचदा केशराचा वापर पूजेमध्ये देखील केला जातो. भगवान विष्णू, गुरु बृहस्पती आणि लक्ष्मी यांना केशर खूप प्रिय मानले जाते. केशराचा संबंध बुध आणि गुरु ग्रहांशी असल्याचे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला बळकट करण्यासाठी केशराचे उपाय करणे खूप फायदेशीर ठरते. असे म्हटले जाते की, केशराचा वापर केल्याने कौटुंबिक वाद, पैशाच्या समस्या आणि नकारात्मकतेपासून सुटका होते. ग्रहांची स्थिती अनुकूल करण्यासाठी केशराचे कोणते उपाय करायचे, जाणून घ्या
ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरुची स्थिथी कमकुवत असते किंवा ज्या व्यक्तीला आर्थिक समस्या जास्त असतात अशा व्यक्तींनी गुरुवारी केशराचे दान करावे त्यामुळे गुरु दोष दूर होण्यास मदत होते.
ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये मांगलिक दोष असतो अशा लोकांनी केशराचा वापर करणे खूप फायदेशीर ठरते. या लोकांनी लाल चंदनामध्ये केसर मिसळून हनुमानाला टिळक लावावे यामुळे कुंडलीमध्ये मंगळाचा असलेला प्रभाव कमी होतो.
ज्या व्यक्तींना पितृदोषाची समस्या आहे अशा लोकांनी पितृदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी केशराचा वापर करावा. चतुर्दशी आणि अमावस्येला केशर जाळावे हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरु शकतो. यामुळे पितृदोष दूर होण्यास मदत होते.
गुरुवारी पांढऱ्या कपड्यात केशर गुंडाळून तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये ठेवा म्हणजे आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे गुरुवारी केशर पाण्यामध्ये मिसळून त्यात थोडी हळद घातल्यास ग्रहांचा अशुभ प्रभाव दूर होण्यास मदत होते.
तुमच्यावर एखाद्या वाईट नजरेपासून बचाव करायचा असल्यास केशराचा वापर करावा. सात केशरची पाने तुमच्या शरीरावर ठेवावी त्यानंतर ती कापूरने जाळावी या उपायाने वाईट नजरेपासून तुमचे रक्षण होऊ शकते.
असे म्हटले जाते की, कोणत्याही शुभ कार्याला जाण्याआधी केशराचा टिळक कपाळाला लावल्याने ते शुभ कार्य पूर्ण होते.
जर पती पत्नींमध्ये सतत वाद होत असल्यास कपाळावर केशराचे टिळक लावल्याने व्यक्तीच्या नात्यांमध्ये कायम गोडवा टिकून राहतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)