फोटो सौजन्य- istock
श्रावण महिना शंकराला समर्पित आहे. शास्त्रामध्ये या महिन्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आलेले आहे. असे म्हटले जाते की, श्रावण महिना हिरवळीने सुरु होतो. श्रावणामध्ये सर्वत्र हिरवळ असते. श्रावण महिन्यामध्ये शंकराची पूजा करण्यासोबतच मेंहदी लावण्याला देखील विशेष महत्त्व आहे. दरम्यान या परंपरेचा सबंध केवळ सौंदर्याशीच नाही तर धार्मिक महत्त्व देखील आहे. श्रावणात मेंहदी का लावावीत, काय आहेत फायदे जाणून घ्या
महिलांनी श्रावण महिन्यामध्ये मेंहदी लावण्यामागचे कारण निसर्गाशी संबंधित असल्याचे मानले जाते. शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, निसर्गाशी एकरुप होण्यासाठी श्रावणामध्ये मेहंदी लावली जाते. वैज्ञानिक कारण पाहिले गेल्यास मेंहदी लावल्याने शरीराला थंडावा मिळतो. ज्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होताना दिसून येतो. श्रावण महिन्यात भरपूर पाऊस असल्याने तुम्हाला त्वचेच्या संबंधित समस्या देखील उद्भवतात. मेंहदीमुळे शरीराला मिळणाऱ्या थंडपणामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते.
पुराणात सांगितल्याप्रमाणे, श्रावण महिन्यात पुरुष आणि स्त्रियांनी ब्रह्मचर्य आणि संयम पाळला पाहिजे. मेंहदी लावण्यामागील आजून एक कारण म्हणजे पुरुष आणि स्त्रियांनी ब्रह्मचर्य आणि संयम पाळला पाहिजे. तसेच मेंहदी मनाला संयमित ठेवण्यास मदत करते कारण त्याचा स्वभाव थंड मानला जातो.
बऱ्याचदा श्रावण महिन्यात नवविवाहित मुली बहुतेकदा आपल्या पतीपासून दूर असलेल्या पालकांच्या घरी जातात आणि तेथे भगवान शिव आणि माता पार्वतीची भक्तीभावाने पूजा करतात.
मेंहदीला वैवाहिक जीवनाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. तळहातावर मेहंदीचा रंग जितका गडद असेल तितकाच जोडीदारामध्ये सुसंवाद आणि प्रेम अधिक असते. श्रावण हा निसर्ग आणि पुरुषाच्या मिलनाचा महिना म्हणून मानला जातो. या महिन्यामध्ये भगवान शिव आणि पार्वती यांची भेट झाली आहे. भगवान शिव यांनी देवी पार्वतीला आपली पत्नी बनवण्याचा आशीर्वाद दिला. पतीच्या दीर्घायुष्यासाठी वैवाहिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद साधण्यासाठी महिला हाताला मेंहदी लावतात. रक्षाबंधन गोकुळष्टामी यांसारखे सण देखील श्रावणामध्ये येतात. मान्यतेनुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी मेंहदी लावल्याने भावाचे आयुष्य वाढते आणि भाऊ-बहिणीच्या नात्यात नेहमीच सुसंवाद राहतो.
पौराणिक मान्यतेनुसार, भगवान शिवाला मिळवण्यासाठी देवी पार्वतीने श्रावण महिन्यात कठोर तपश्चर्या केली. तेव्हापासून, श्रावण हा सण वैवाहिक आनंद आणि महिलांसाठी अखंड सौभाग्याच्या इच्छेशी संबंधित मानला जातो. या महिन्यामध्ये मेहंदी लावल्याने देवी पार्वती प्रसन्न होते. पतीच्या दीर्घायुष्य आणि वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद प्राप्त होतो, असे म्हटले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)