फोटो सौजन्य- pinterest
ग्रह आणि नक्षत्रांच्या बदलत्या हालचालीनुसार आज शुक्रवार 11 जुलैचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहील. तर काही राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील अशा लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
ग्रह आणि नक्षत्रांच्या बदलत्या हालचालीता प्रत्येक राशीच्या लोकांवर विविध परिणाम होताना दिसून येतो. त्यांच्या या बदलांमुळे कोणत्या राशीच्या लोकांचा दिवस चांगला असेल तर काही राशीच्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. ज्यावेळी एखादा ग्रह अनुकूल असतो त्यावेळी त्याचा तुमच्यावर अनुकूल परिणाम होताना दिसून येतो. आजचा शुक्रवारचा दिवस कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असेल, जाणून घ्या.
गुरू आणि सूर्य मिथुन राशीत असल्यामुळे या राशीच्या लोकांच्या बुद्धिमत्ता, संवाद आणि आत्मविश्वासात वाढ होईल. जे लोक कठोर मेहनत घेतल्यास तुम्हाला त्या खूप फायदा होईल. प्रशासकीय कामात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. कोणतेही निर्णय घेताना आत्मविश्वासाने घ्यावे. तसेच तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
कर्क राशीच्या लोकांना बुध ग्रह हा संवाद आणि बौद्धिक कार्यात यश देईल. या लोकांमध्ये असलेले मतभेद किंवा दीर्घकाळापासून सुरु असलेले वाद मिटू शकतात. जुन्या योजनेत गुंतवणूक केली असल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल.
सिंह राशीमध्ये केतू आणि मंगळ असल्याने या लोकांमध्ये धैर्य आणि ऊर्जा वाढलेली राहील. या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच तुम्हाला काम किंवा व्यवसायानिमित्त बाहेर प्रवास करावा लागू शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवाल. तुम्हाला जीवनामध्ये सकारात्मक बदल होताना दिसून येतील.
तूळ राशीमध्ये शुक्राच्या असल्यामुळे या राशीच्या लोकांना सामाजिक आणि आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. या लोकांचे अडकलेले पैसे परत मिळतील. तसेच प्रवास यशस्वी होईल. एखाद्या जुन्या योजनेत गुंतवलेले पैसे परत मिळतील. दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल. कामाच्या ठिकाणी ताण असू शकतो.
मकर राशीतील चंद्राच्या संक्रमणामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना नियोजनात मदत होईल. तसेच त्यांच्या कार्यशैलीमध्ये होणारे बदल फायदेशीर ठरतील. व्यवसायामध्ये नवीन योजना आखल्या असल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. स्पर्धकांपासून सावध रहा आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)