Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shravan 2026: श्रावणातील पहिल्या शुक्रवारी केली जाते जिवतीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत आणि धार्मिक महत्त्व

यंदा श्रावणातील पहिला शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी आहे. हा दिवस प्रामुख्याने माता लक्ष्मी आणि अपत्यांच्या दीर्घायष्यासाठी आणि रक्षणासाठी केल्या जाणाऱ्या जिवतीची पूजा विशेष महत्त्वाची मानली जाते. शुक्रवारी जिवतीची पूजा करण्याची पद्धत आणि धार्मिक महत्त्व जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 14, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- गुगल

फोटो सौजन्य- गुगल

Follow Us
Follow Us:
  • श्रावणातील पहिल्या शुक्रवारी केली जाते जिवतीची पूजा
  • जिवतीची पूजा करण्याची पद्धत
  • जिवतीची पूजा का केली जाते
 

यंदा १३ ऑगस्टपासून श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. श्रावणात केल्या जाणाऱ्या प्रमुख व्रतांपैकी एक म्हणजे जिवतीचे व्रत. जिवतीला जिवंतिका असे देखील म्हटले जाते. यावेळी हे व्रत शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी आहे. यंदा जिवतीची पूजा करण्यासाठी पाच शुक्रवार येत आहे. श्रावणातील शुक्रवारी केली जाणारी जिवतीची पूजा ही महिलांसाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. मुलांचे आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धीसाठी जिवती मातेला प्रार्थना करण्याची ही पारंपरिक पद्धत आहे. शुक्रवारी जिवतीची पूजा करण्याची पद्धत आणि धार्मिक महत्त्व जाणून घेऊया

जिवतीची पूजा म्हणजे काय?

जिवतीला महाराष्ट्रातील लोकपरंपरेत बालकांचे रक्षण करणारी देवी मानले जाते. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी किंवा काही कुटुंबांच्या परंपरेनुसार ठराविक शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. घरातील लहान मुलांचे आरोग्य चांगले राहावे आणि त्यांच्यावर देवीची कृपादृष्टी असावी, अशी श्रद्धा या पूजेमागे आहे.

Shravan 2026: श्रावणात लावा ‘ही’ रोप, दूर होतील सर्व दोष आणि घरात येईल सुख शांती

पहिल्या शुक्रवारी जिवतीची पूजा का करतात?

श्रावणातील पहिला शुक्रवार हा अनेक महिलांसाठी विशेष असतो. या दिवशी घरातील देवघर स्वच्छ करून जिवतीची प्रतिमा किंवा चित्र लावले जाते. हळदीकुंकू, अक्षता, फुले आणि नैवेद्य अर्पण करून जिवती मातेची पूजा केली जाते. काही कुटुंबांमध्ये ही पूजा पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या घरच्या परंपरेनुसार केली जाते.

जिवतीची पूजा करण्याची पद्धत

सकाळी घर आणि देवघर स्वच्छ करावे.

जिवतीचे चित्र किंवा प्रतिमा पाटावर ठेवावी.

हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करावीत.

दिवा आणि धूप लावावा.

जिवती मातेची पूजा करून मुलांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी.

त्यानंतर गोड नैवेद्य दाखवून आरती करावी.

मुलांना प्रसाद देऊन त्यांना औक्षण करण्याचीही परंपरा आहे.

Nagpanchami 2026: यंदा कधी साजरी होणार नागपंचमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

जिवतीचे चित्र का लावतात

जिवतीची पारंपरिक चित्रे विशेष स्वरूपाची असतात. त्यामध्ये जिवती देवीसोबत मुलांचे रक्षण करणाऱ्या विविध देवतांचे प्रतीकात्मक चित्रण केलेले आढळते. श्रावणात हे चित्र देवघरात किंवा घरातील पवित्र ठिकाणी लावून त्याची पूजा करण्याची परंपरा आहे.

मुलांच्या आरोग्यासाठी केली जाते प्रार्थना

जिवतीच्या पूजेचा मुख्य उद्देश मुलांचे आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धी अशी प्रार्थना करणे हा आहे. विशेषतः आई आपल्या मुलांसाठी श्रद्धेने जिवती मातेकडे प्रार्थना करते. मुलांना ओवाळून त्यांना प्रसाद दिला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: श्रावणातील जिवतीची पूजा कधी केली जाते?

    Ans: श्रावण महिन्यातील शुक्रवारी जिवतीची पूजा करण्याची परंपरा आहे. अनेक कुटुंबांमध्ये श्रावणातील पहिल्या शुक्रवारी ही पूजा केली जाते.

  • Que: जिवती पूजेचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: ही पूजा मुलांच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी केलेल्या प्रार्थनेचे प्रतीक मानली जाते.

  • Que: जिवतीच्या पूजेत मुलांना ओवाळतात का?

    Ans: काही कुटुंबांमध्ये जिवतीची पूजा केल्यानंतर मुलांना औक्षण किंवा ओवाळण्याची परंपरा आहे. ही पद्धत कुटुंबाच्या रूढीनुसार बदलू शकते.

Web Title: Shravan 2026 first friday of shravan jivati puja method and religious significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Shravan 2026

संबंधित बातम्या

Navratri 2026: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही जव उगवले नाहीत? ‘हे’ संकेत दुर्लक्षित करू नका, लगेच करा ‘हा’ उपाय
1

Navratri 2026: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही जव उगवले नाहीत? ‘हे’ संकेत दुर्लक्षित करू नका, लगेच करा ‘हा’ उपाय

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त
2

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

Pitru Paksha 2026:  पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! पूर्वजांशी जोडलेली आहे खास मान्यता
3

Pitru Paksha 2026: पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! पूर्वजांशी जोडलेली आहे खास मान्यता

Pitru Paksha 2026: सवाष्ण महिलेचे ‘भरणी श्राद्ध’ करावे का? धार्मिक परंपरेत वेगवेगळी मते
4

Pitru Paksha 2026: सवाष्ण महिलेचे ‘भरणी श्राद्ध’ करावे का? धार्मिक परंपरेत वेगवेगळी मते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.