Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुरंबवच्या श्री शारदा देवी मंदिरात नवरात्र उत्सवाची चाहूल, 3 ऑक्टोबर पासून नेत्रदीपक शारदोत्सव होणार सुरु

सध्या देशभरात नवरात्री उत्सवाची लगबग दिसून येत आहे. अनेक मंडळं दुर्गा देवीच्या आगमनासाठी सज्ज होत आहे तर दुसरीकडे चिपळूण येथील तुरंबव गावात सुद्धा दिमाखदार शारदोत्सवाची तयारी सुरु झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 28, 2024 | 09:34 PM
तुरंबवच्या श्री शारदा देवी मंदिरात नवरात्र उत्सवाची चाहूल, 3 ऑक्टोबर पासून नेत्रदीपक शारदोत्सव होणार सुरु

तुरंबवच्या श्री शारदा देवी मंदिरात नवरात्र उत्सवाची चाहूल, 3 ऑक्टोबर पासून नेत्रदीपक शारदोत्सव होणार सुरु

Follow Us
Close
Follow Us:

शारदा देवीचे मंदिर म्हणजे दक्षिणात्य स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे. या मंदिरात श्री शारदा देवी बरोबरच श्री वरदान देवी श्री मानाई देवी आणि श्री चंडिका देवी यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. नवरात्र काळात या देवींच्या रुप्याच्या मूर्ती बरोबरच गौराई देवीच्या मूर्तीची ही स्थापना करण्यात येते. येत्या 3 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी सहा वाजले पासून सदर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहील.अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या रुप्याच्या मूर्तीची व गौराई देवीची प्रतिष्ठापना करून या मूर्तींना वस्त्रालंकारनी सजविले जाते. विजयादशमी पर्यंत नऊ दिवस हा साज भाविकांच्या मनाला एक वेगळाच आनंद देतो.

हे देखील वाचा: Navaratri: चौथ मातेचे सर्वात जुने मंदिर, दर्शन घेतल्यास आजन्म सौभाग्याचा मिळतो आशीर्वाद

प्रेक्षणीय विद्युत रोषणाई, विलोभनीय निसर्ग सौंदर्य, फुलांची आरास यामुळे हे मंदिर भाविकांच्या मनाला भुरळ घालते. सकाळी 8 ते संध्याकाळी 11.30 पर्यंत अविरतपणे दर्शन फेरी चालू असते. रात्री नऊ वाजता देवीची महाआरती होते .तसेच 10.30 व 11.30 ला जाखडी नृत्याला सुरुवात होते. परंपरागत वेशभूषेत सादर केलेले हे जाखडी नृत्य म्हणजे लोककलेचा एक वेगळाच अविष्कार असतो. हे सर्व पाहण्यासाठी भाविकांची नऊ दिवस गर्दी उसळते. रात्री साडे अकरानंतर संतती विषयक नवस करणे व ते फेडणे याची मंदिरात रीघ लागलेली असते. रात्री 11.30 नंतर येणाऱ्या भाविकांसाठी मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

संततीसाठी पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी देवी अशी ख्याती असलेल्या चिपळूण तालुक्यातील तुरंबवची श्री शारदा देवीच्या नवरात्रोत्सव दिनांक 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. श्री शारदा देवीचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे. आजच्या आधुनिक युगात तरुण पिढीला दांडिया, गरबा अशा नाचांची आवड असताना देखील या उत्सवात गेली शतकापासून सुरू असलेले पारंपारिक जाखडी नृत्य हे भाविकांचे एक मोठेच आकर्षण असते.

भक्त निवासाची उत्तम सोय

मुंबई गोवा महामार्गावर सावर्डे येथून पश्चिमेकडे साधारणपणे 11 किलोमीटर अंतरावर तुरंबव या निसर्गरम्य गावी शारदा देवीचे मंदिर आहे. नवरात्र उत्सव काळात बाहेर गावाहून येणाऱ्या सर्व भाविकांची श्री शारदा देवी मंदिर परिसरात भक्तनिवासाची उत्तम सोय असून न्यासाचे सर्व विश्वस्त मंडळ व पदाधिकारी या सर्व भाविकांची सेवा करण्यासाठी तत्पर असतात.

नऊ दिवसाच्या दिमागदार कार्यक्रमानंतर विजयादशमी दिवशी संध्याकाळी मंदिरासमोरील प्रांगणात गावकऱ्यांच्या उपस्थितीत सामुदायिक सोने लुटण्याचा सोहळा साजरा केला जातो व हा सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. श्री शारदा देवीचा नवरात्रोत्सव अत्यंत सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शारदा देवी ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने सध्या जयत तयारीची लगबग सुरू असून सर्वांचे सहकार्य लाभत आहे.

Web Title: Shree sharda devi temple turambav navratri festival spectacular saradotsav will start from 3rd october

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 08:53 PM

Topics:  

  • Navratri festival

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.