फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह प्रेम, आकर्षण, सौंदर्य, कला, भौतिक सुखसोयी आणि वैवाहिक जीवनाचे प्रतीक मानला जातो. तसेच व्यक्तीच्या जीवनात नातेसंबंध, प्रेम, सौंदर्याची भावना आणि भावनिक जोड यांच्या गोडव्यावर नियंत्रण ठेवतो. 28 जानेवारीपासून शुक्र ग्रह मीन राशीत आहे, जिथे तो श्रेष्ठ मानला जातो आणि त्याचा प्रभाव तुलनेने आनंददायी आणि संतुलित राहिला आहे. मीन राशीत शुक्राचे परिवर्तन सहसा प्रेम संबंधांमध्ये गोडवा, सहानुभूती आणि समजूतदारपणा आणते.
परंतु आता शनिवार, 31 मे सकाळी 11.42 वाजल्यापासून शुक्र मीन रास सोडून मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष रास ही अग्नी तत्वाची रास मानली जाते आणि मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली येत असल्याने कृती, ऊर्जा आणि कधीकधी आक्रमकतेचे प्रतीक आहे. जेव्हा शुक्र ग्रह या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा भावनांच्या स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो. या संक्रमणाचा प्रभाव विशेषतः काही राशींवर दिसून येईल, जिथे प्रेम आणि वैवाहिक संबंधांमध्ये गोंधळ, असंतुलन आणि संवादाचा अभाव यासारख्या परिस्थिती उद्भवू शकतात. यावेळी अनेकांना नातेसंबंधामध्ये चढ-उतार आणि भावनिक त्रासांना तोंड द्यावे लागू शकते. या संक्रमणादरम्यान कोणत्या राशींच्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी ते जाणून घेऊया.
शुक्र मीन रास सोडून 31 मे रोजी मेष राशीत प्रवेश करत आहे. यामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण बाराव्या घरात म्हणजेच खर्च आणि नुकसानाच्या घरात होईल. ज्योतिषशास्त्रात, बारावा भाव नुकसान, खर्च आणि मानसिक असंतुलनाशी संबंधित मानला जातो. या राशीच्या लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनावश्यक खर्च, दिखावा करण्याची प्रवृत्ती आणि सामाजिकदृष्ट्या स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याचे प्रयत्न तुम्हाला अडचणीत आणू शकतात.
कन्या राशीसाठी शुक्राचे संक्रमण आठव्या घरात होत आहे. जे अनपेक्षित घटना आणि मानसिक अशांततेचे घर मानले जाते. त्यामुळे या लोकांच्या जीवनात अचानक बदल होऊ शकतात. विशेषतः विवाह आणि प्रेमसंबंधांमध्ये. जर लग्नाच्या चर्चा सुरू असतील तर त्यात अडथळा किंवा विलंब होऊ शकतो.
वृश्चिक राशीसाठी शुक्राचे संक्रमण सहाव्या घरात होत आहे. जो रोग, शत्रू आणि स्पर्धा दर्शवतो. यावेळी वृश्चिक राशीच्या लोकांनी आरोग्याच्या संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, विशेषतः पचन आणि आहाराशी संबंधित समस्यांना. या लोकांनी तळलेले आणि बाहेरचे अन्न खाणे टाळावे. हा काळ प्रेम आणि वैवाहिक जीवनात आव्हानांनी भरलेला असू शकतो. तुम्ही तुमच्या मनात लपवून ठेवलेल्या गोष्टी तुमच्या जोडीदाराला अस्वस्थ करू शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)