फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांचा राजा सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. परंतु तो लवकरच आपले नक्षत्र बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य रविवार, 8 जून रोजी वृषभ राशीत राहून मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करेल. तो सकाळी 7.26 वाजता या नक्षत्रात भ्रमण करेल. त्यानंतर, 15 जून रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करेल. सूर्य हा स्वाभिमान, शक्ती आणि उच्च पदाचे प्रतीक असलेला ग्रह आहे. त्याला ग्रहांचा राजा म्हणूनही ओळखले जाते. म्हणून, जेव्हा तो संक्रमण करतो तेव्हा काही जातकांना त्यांच्या कारकिर्दीत आदर आणि यश मिळते. यावेळी सूर्य मृगशिरा नक्षत्रात प्रवेश केल्याने कोणत्या राशींना फायदा होईल ते जाणून घेऊया.
सूर्याच्या नक्षत्रातील बदलामुळे या लोकांचे चांगले दिवस सुरु होतील कारण सूर्य देव तुमच्या राशीचा स्वामी आहे. या बदलामुळे सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात सुरू असलेल्या समस्या संपतील. सर्व प्रलंबित कामेदेखील पूर्ण होतील. तुमच्या प्रेम आयुष्यात तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला भरपूर प्रेम मिळेल. यावेळी, तुम्हाला आदर आणि सन्मान मिळेल. सामाजिक वर्तूळ विस्तारेल. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. तुम्हाला पैसे वाचवण्याची संधी मिळेल. संक्रमणाच्या सुरुवातीला तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायासाठी बनवलेल्या सर्व रणनीती नफा देऊ शकतात. आत्मविश्वास वाढेल. त्यासोबतच तुम्ही मालमत्ता आणि वाहन खरेदी करु शकतात.
सूर्याच्या नक्षत्रातील बदल तूळ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकतो. या लोकांना आर्थिक लाभाची शक्यता प्रबळ असेल. तुमचे उत्पन्न वाढेल. अध्यात्मिक आवड वाढेल. व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळेल. वडिलोपार्जित व्यवसायातून मोठा नफा होऊ शकतो. या काळात, बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. नात्यांमध्ये प्रेम आणि विश्वास वाढेल. ज्या काही समस्या तुम्हाला त्रास देत होत्या, त्या नक्कीच संपतील. तसेच, या काळात तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल.
धनु राशीच्या लोकांना सूर्याचे नक्षत्र परिवर्तन फायदेशीर ठरु शकते. धनु राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती राहील. व्यवसायात चांगला नफा होईल. व्यवसायात आर्थिक प्रगती दिसून येईल. आयुष्यात आनंद येईल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ पूर्णपणे शुभ आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांचे प्रभावशाली लोकांशी संबंध अधिक मजबूत होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)