Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shukra Gochar: जन्माष्टमीनंतर तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशीच्या लोकांवर पडणार पैशांचा पाऊस

शुक्र ग्रह 21 ऑगस्ट रोजी कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे तर 11 ऑगस्टपासून बुध ग्रह कर्क राशीत स्थित असेल. या दोन्ही ग्रहांच्या युतीचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 06, 2025 | 01:15 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

कर्क राशीमध्ये शुक्र आणि बुध यांच्या एकत्रित येण्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग खूप शुभ आणि फायदेशीर मानला जातो. हा योग व्यक्तीच्या जीवनामध्ये समृद्धी, संपत्ती आणि प्रगतीचे प्रतीक मानला जातो. हा राजयोग जन्माष्टमीनंतर तयार होत आहे. 21 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर 11 ऑगस्टपासून बुध ग्रह कर्क राशीत स्थित असेल. या दोन्ही ग्रहांच्या युतीचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे.

या शुभ योगामुळे काही राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ, मान-सन्मानात वाढ आणि भौतिक सुखसोयींचा विस्तार होणार आहे. ज्या लोकांना बराच काळ प्रयत्न करुनही अपेक्षित यश मिळत नाही अशा लोकांना हा काळ चांगला राहील. लक्ष्मी नारायण राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल, जाणून घ्या

मेष रास

21 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह तुमच्या कुंडलीच्या चौथ्या घरात संक्रमण करणार आहे. हे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. यावेळी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या बऱ्याच काळापासून अपूर्ण असलेल्या इच्छा पूर्ण होतात. घर, वाहन किंवा घराच्या सजावटीशी संबंधित कोणतीही योजना आता प्रत्यक्षात येऊ शकते. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ देखील होऊ शकतात.

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला बहिणीने भावाला राखी बांधली नाही तर काय होईल? जाणून घ्या

कर्क रास

कर्क राशीच्या कुंडलीमध्ये हे संक्रमण पहिल्या घरात होत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वावर आणि जीवनशैलीवर त्याचा परिणाम होणार आहे. तुमचे आकर्षण, सौंदर्य आणि प्रभाव त्यामुळे वाढेल. कला, लेखन, संगीत आणि फॅशनशी संबंधित असलेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ फायदेशीर राहील. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. वैयक्तिक जीवनात आनंद राहील.

कन्या रास

कन्या राशीच्या कुंडलीमध्ये हे संक्रमण अकराव्या घरात होणार आहे. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरीतील बोनस असो, गुंतवणुकीतून नफा असो किंवा जुन्या कर्जाची परतफेड होऊ शकते. यावेळी नशीब तुमच्या बाजूने राहील. जवळच्या लोकांकडून पाठिंबा मिळेल. या संक्रमणामुळे तुम्हाला संपत्ती, आदर आणि समाधानाच्या मार्गावर पुढे घेऊन जाईल.

Astro Tips: या गोष्टींच्या वापराने घरात सकारात्मक ऊर्जा करेल प्रवेश, प्रत्येक कामात मिळेल यश

वृश्चिक रास

शुक्र ग्रह या राशीमध्ये नवव्या घरामध्ये असल्याने या लोकांचे नशीब तुमच्या बाजूने राहणार आहे. त्याचप्रमाणे या काळामध्ये तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक ठिकाणी फिरायला जाऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कौटुंबिक संबंध सुधारतील आणि घरी काही शुभ कार्यक्रमाचे आयोजन करु शकता. सरकारी नोकरीतील लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहांचे हे संक्रमण सातव्या घरात होणार आहे. या काळामध्ये तुम्हाला विवाह आणि भागीदारीच्या बाबतीत सकारात्मक परिणाम मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी ताण येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shukra gochar lakshmi narayan yoga will be formed after janmashtami it will benefit the people of this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Dev Puja Rules: देवपूजेत अत्तराचा उपयोग करण्याचे महत्त्व काय? कोणत्या देवतेच्या पूजेत घ्यावी विशेष
1

Dev Puja Rules: देवपूजेत अत्तराचा उपयोग करण्याचे महत्त्व काय? कोणत्या देवतेच्या पूजेत घ्यावी विशेष

Valmiki Jayanti: आदिकवी महर्षी वाल्मिकी कोण होते? रामायणाची रचना आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रवास
2

Valmiki Jayanti: आदिकवी महर्षी वाल्मिकी कोण होते? रामायणाची रचना आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रवास

Shivling Abhishek: महादेवाच्या शिवपिंडीवर जलाभिषेक का करतात? जाणून घ्या धार्मिक कारण आणि महत्त्व
3

Shivling Abhishek: महादेवाच्या शिवपिंडीवर जलाभिषेक का करतात? जाणून घ्या धार्मिक कारण आणि महत्त्व

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.