फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह भौतिक सुखसोयी, वैभव, प्रेम, सौंदर्य, कला आणि समृद्धीचा कारक मानला जातो. जेव्हा शुक्र ग्रह आपले नक्षत्र बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. जून महिन्यामध्ये शुक्र ग्रह एकदा नव्हे तर दोनदा आपले नक्षत्र बदलणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचे मानले जाते.
शुक्र ग्रहाचे पहिले नक्षत्र संक्रमण शुक्रवार, 13 जून रोजी रात्री 9.21 वाजता होईल त्यावेळी शुक्र भरणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तर दुसरे संक्रमण गुरुवार, 26 जून रोजी दुपारी 12.24 वाजता कृतिका नक्षत्रात करेल. या दोन नक्षत्रांच्या बदलांचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होऊ शकतो. कोणत्या 3 राशीच्या लोकांना या नक्षत्र बदलाचा फायदा होईल ते जाणून घेऊया
जून महिन्यात शुक्र ग्रह नक्षत्र बदलत आहे त्याचा मिथुन राशीच्या लोकांना लाभ होऊ शकतो. हे संक्रमण तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे संक्रमण फायदेशीर आहे. तुमच्यासाठी आध्यात्मिक आणि भौतिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. व्यवसाय किंवा व्यापारात गुंतलेल्या लोकांसाठीही हा काळ फायदेशीर ठरू शकतो. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा आणि विशेष प्रार्थना केल्याने तुमच्या जीवनात आनंद, सौंदर्य आणि समृद्धी येऊ शकते.
जून महिन्यात शुक्र ग्रहांचे नक्षत्र बदल सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ आणि अनुकूल राहणार आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि परस्पर विश्वास अधिक दृढ होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्साहवर्धक असेल. ते त्यांच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवतील आणि अभ्यासावरही लक्ष केंद्रित करू शकतील. नोकरी करणाऱ्या लोकांना बोनस, प्रोत्साहन किंवा पदोन्नतीसारखे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला चांगला परतावा मिळेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे.
शुक्र ग्रहांचे हे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा दिवस अत्यंत शुभ आणि भाग्यवान ठरु शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या संक्रमणादरम्यान चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेषतः अनुकूल राहील. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. या संक्रमणामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनू शकता. तुम्हाला एक नवीन आणि मोठी डील मिळू शकते, ज्यामुळे फायदेशीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)