फोटो सौजन्य- .pinterest
आज बुधवार, 4 जून. मूलांक 4 असणाऱ्यांचा स्वामी ग्रह राहू आहे. अंकशास्त्रानुसार, बुधाची संख्या 5 मानली जाते. मूलांक 4 असलेले लोक जुन्या योजनेतून नफा मिळवू शकतात, तर मूलांक 5 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन बदलांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावा. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. तसेच काही कठीण निर्णयदेखील घ्यावे लागतील. नवीन काही योजना आखताना त्यात अडथळे येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी काम पूर्ण करण्यासाठी उत्साह असेल, परंतु तुम्हाला संयम आणि पूर्ण नियोजनाने पुढे जावे लागेल.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला कोणताही निर्णय काळजीपूर्वक विचार करून घ्यावा लागेल, अन्यथा अडचणी येऊ शकतात. संध्याकाळपर्यंत तुमचा मानसिक ताण कमी होईल आणि तुम्हाला शांती मिळेल.
मूलांक 3 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. लेखन, भाषण किंवा अध्यापनाशी संबंधित लोकांना आज त्यांच्या क्षेत्रात विशेष यश मिळू शकते.
मूलांक 4 असणारे लोक व्यवसायात जुन्या योजनेवर काम सुरु करु शकतात. तुमच्या शहाणपणाने आणि हुशारीने ते पुढे नेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नफा मिळू शकतो. आज तुम्हाला मेहनतीचे फळ मिळू शकते.
मूलांक 5 असलेल्या लोकांना नवीन बदलांना सामोरे जावे लागू शकते. विचार न करता कोणताही निर्णय घेणे टाळा. आज तुम्ही प्रवास, संवाद किंवा तांत्रिक कामांमध्ये अधिक व्यस्त असू शकता.
मूलांक 6 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांशी संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करू शकता आणि कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी असलेले संबंध देखील सुधारतील.
मूलांक 7 असलेल्या लोकांना त्यांच्या आयुष्याबद्दल खोलवर विचार करायला आवडेल आणि जगाच्या गर्दीपासून दूर एकांतात वेळ घालवायला आवडेल. आज तुमच्या मनात एक जुना विचार पुन्हा येऊ शकतो.
मूलांक 8 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी व्यस्त राहतील. तुम्हाला कामाचा थोडासा दबाव जाणवू शकतो. आर्थिक आणि व्यावसायिक बाबींमध्ये विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी काही बाबींवर त्वरित प्रतिक्रिया देणे टाळावे लागेल. आज तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी देखील पुढे जाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)