फोटो सौजन्य- pinterest
शुक्र ग्रह मंगळवार, 8 जुलै रोजी रोहिणी नक्षत्रात संक्रमण करणार आहे आणि त्या नक्षत्रामध्ये 20 जुलैपर्यंत राहणार आहे. त्याचे हे संक्रमण दुपारी 4.31 वाजता होणार आहे. त्याच्या या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांवर शुभ परिणाम होऊ शकतो. रोहिणी नक्षत्र चंद्राच्या अधिपत्याखाली येत असल्याने शुक्रामध्ये प्रेम, नातेसंबंध आणि भौतिक सुख आणि समृद्धी इत्यादीचे प्रतीक मानले जाते. ज्यावेळी शुक्र रोहिणी नक्षत्रात असतो त्यावेळी काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. या संक्रमणाचा परिणाम वृषभ आणि तूळ राशीसह इतर राशींवर देखील होतो. शुक्र ग्रहाच्या नक्षत्र संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचे हे संक्रमण खूप फायदेशीर राहणार आहे. या लोकांना करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. तसेच नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रभाव देखील वाढेल. या लोकांच्या व्यावसायिक जीवनात स्थिरता आणि प्रगती येईल. मात्र या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या लोकांचा हा काळ आनंद, संपत्ती आणि सन्मानाने भरलेला राहील.
करिअर आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून बघायला गेल्यास हे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरेल. या लोकांच्या कार्यशील आणि विचारक्षमतेमुळे या लोकांची कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. तसेच या लोकांना नोकरीच्या विशेष संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना फायदा होईल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध आणि व्यावसायिक वाढ हा काळ संस्मरणीय बनवू शकते. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते चांगले राहील.
तूळ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर राहील. या लोकांना आर्थिक फायदे होऊ शकतात. विमा किंवा कर क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांना अचानक मोठा नफा मिळू शकतो. नातेसंबंधामध्ये गोडवा टिकून राहील. आर्थिक आणि वैयक्तिक दोन्ही क्षेत्रात स्थिरता आणू शकतो.
शुक्र ग्रहाचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील. यावेळी या लोकांच्या खर्चामध्ये वाढ होऊ शकते. खासकरुन विलासिता, सजावट, फॅशन किंवा आरामदायी गोष्टींवर जास्त खर्च होईल. तसेच तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते. नोकरी, उच्च शिक्षण किंवा आध्यात्मिक प्रवासासाठी परदेशात जाणे शक्य आहे.
मीन राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे संक्रमण खूप फायदेशीर राहील. या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती, पगारवाढ यांसारख्या इच्छित गोष्टी प्राप्त होतील. जे लोक भागीदारीमध्ये व्यवसाय करत आहे त्यांना फायदा होईल. समाजात तुमचा प्रभाव आणि लोकप्रियता वाढेल. करिअरशी संबंधित मोठ्या योजना आकार घेऊ शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)