
फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रात, सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. जो आत्मा, पिता, मान आणि सरकारी नोकरीचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो तेव्हा त्याला संक्रांती असे म्हटले जाते. पंचांगानुसार यावर्षी 16 डिसेंबर रोजी सूर्य देव वृश्चिक रास सोडून गुरूच्या राशी धनु राशीत प्रवेश करेल. या महत्त्वाच्या घटनेला धनु संक्रांती म्हणून ओळखले जाते. सूर्याचे हे संक्रमण सर्व राशीच्या लोकांवर विविध प्रकारे होते. परंतु विशेषतः काही राशी अशा आहेत अशो लोकांना विशेष यश मिळणार आहे. यावेळी या राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल होताना दिसून येतील. ज्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. सूर्य संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण नवव्या घरात होत आहे. त्यांच्यासाठी हा काळ खूप शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमची प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतात. व्यवसायात चांगला फायदा होण्याची शक्यता. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. या काळात तुमची अध्यात्मात आवड वाढेल. लांब पल्ल्याचा प्रवास शक्य आहे, जो भविष्यात फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आणि मोठ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.
सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे जो या घराच्या पाचव्या स्थानावर आहे. या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा खूप चांगला असणार आहे. या काळामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होईल. प्रेमसंबंधासाठी हा काळ चांगला असणार आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण तिसऱ्या घरामध्ये होणार आहे. या संक्रमणामुळे तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता अधिक मजबूत होईल, ज्यामुळे तुमच्या करिअरला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. लहान भावंडांशी संबंध सुधारतील. या संक्रमणामुळे तुमच्या उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे.
यावेळी सूर्य स्वतःच्या राशीत संक्रमण करत असल्याने या संक्रमणाचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर आणि आरोग्यावर परिणाम होताना दिसून येणार आहे. तुमचे व्यक्तिमत्व अधिक उजळ आणि आकर्षक होईल, ज्यामुळे तुम्ही लक्ष केंद्रीत व्हाल. या काळात आरोग्यात सुधारणा होईल. जुने आजार दूर होतील. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. तसेच सरकारी कामात यश मिळण्याची शक्यता जास्त आहे.
मीन राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण दहाव्या घरात होत आहे. दहाव्या घराला राजयोगाचे स्थान मानले जाते. कामाच्या ठिकाणी मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन नोकरी किंवा उच्च पद मिळू शकते. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर आहे. आदर आणि अधिकार वाढतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: सूर्य 16 डिसेंबर रोजी संक्रमण करणार आहे
Ans: सूर्य धनु राशीत संक्रमण करणार आहे
Ans: सूर्याच्या संक्रमणाचा मेष, सिंह, तूळ, धनु आणि मीन राशीच्या लोकांवर प्रभाव पडेल