होळीपूर्वी होणार सूर्य गोचर, कोणत्या राशींवर होणार परिणाम (फोटो सौजन्य - iStock)
१४ मार्च रोजी होळी साजरी केली जाईल. हिंदू धर्मात होळी हा एक मोठा सण मानला जातो, यावर्षीची होळी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही खूप खास आहे. तसेच या वर्षी, होळीच्या दिवशी आणि त्याच्या आसपास चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यासारख्या महत्त्वाच्या खगोलीय घटना घडत आहेत. एकंदरीतच या होळीत अनेक बदल होणार आहेत असे दिसून येत असल्याचे ज्योतिषी समीर मणेरीकर यांनी सांगितले आहे.
होळीच्या वेळी होणारे सूर्य गोचर हे अनेक राशींच्या आयुष्यात वेगळे बदल घडवून आणणार आहेत. यावेळी होळीच्या दिवशी अनेक ग्रह आपली चाल बदलणार आहेत आणि त्याचा परिणाम हा थेट राशींवर होणार आहे. या राशी नक्की कोणत्या आहेत आणि कोणत्या राशींवर याचा परिणाम दिसून येणार आहे आपण या लेखातून जाणून घेऊया
प्रदोष व्रताच्या दिवशी शंकराला या गोष्टी अर्पण करा, होतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण
नक्की काय होणार बदल
यावर्षी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण मीन राशीत होत आहे. या दिवशी, ग्रहांचा राजा सूर्यदेखील गोचर होत आहे आणि मीन राशीत प्रवेश करत आहे. यामुळे मीन राशीत सूर्य आणि चंद्राची युती होत आहे. यानंतर बरोबर १५ दिवसांनी सूर्यग्रहण होत आहे. तसेच या दिवशी शनि गोचर होत मीन राशीत प्रवेश करत आहे. अडीच वर्षांनी शनी भ्रमण करेल आणि हा एक मोठा बदल आहे. हे सर्व बदल सर्व १२ राशींवर परिणाम करतील, तर ५ राशींसाठी ते चांगले ठरणार नसल्याचे ज्योतिषांनी सांगितले आहे. कोणत्या आहेत या राशी?
या आहेत भगवान विष्णूंच्या आवडत्या राशी, अचानक मिळते संपत्ती
विवाद आणि धनहानीचे योग
होळीच्या दिवशी आणि आजूबाजूला होणाऱ्या या प्रमुख ग्रहांच्या संक्रमणांमुळे ५ राशीच्या लोकांचे मोठे नुकसान होऊ शकते. या राशी आहेत – मेष, मिथुन, वृश्चिक, मकर आणि मीन. होळीपूर्वी या लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. एखाद्याशी वाद होऊ शकतो. विचार न करता केलेल्या गुंतवणुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते. आर्थिक अडचणी येऊ शकतात. पैशाचे व्यवहार करताना काळजी घ्या. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. गाडी चालवताना काळजी घ्या.
मेष राशीच्या लोकांसाठी, शनीची साडेसाती २९ मार्चपासून सुरू होणार आहे, म्हणून त्यांनी विशेषतः सावधगिरी बाळगली पाहिजे असा सल्ला ज्योतिषाचार्यांनी दिला आहे. येणारे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे या राशींसाठी त्रासदायक असल्याने त्यांनी आधीपासूनच मानसिक तयारी करावी असाही सल्ला त्यांनी दिला आहे.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.