Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi 2026: पालखी आणि होळीचा काय आहे संबंध, जाणून घ्या कोकणातील पालखी परंपरा

होळीच्या सणाची सर्वत्रच धामधुम असलेली दिसून येते. होळीचा सण हा कोकणामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याला शिमगा असे म्हटले जाते. कोकणातील पालखीची परंपरा काय आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 25, 2026 | 12:01 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • पालखी आणि होळीचा काय आहे संबंध
  • कोकणातील पालखी परंपरा
  • होळी उत्सवाची धामधूम
 

होळी म्हटले की सगळ्यात पहिल्यांदा नजरेसमोर येते ते कोकण. कोकणात होळीच्या सणाची सर्वत्रच धामधूम असलेली दिसून येते. होळीचा सण हा कोकणामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो; त्याला शिमगा असेही म्हटले जाते. शिमगा उत्सवासाठी मुंबईतून लोक गावाकडे म्हणजे कोकणात जातात. कोकणामध्ये देखील शिमग्याचा उत्सव विविध प्रकारे साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्यामागे विविध रुढी परंपरा आहे. कोकणात होळीला पालखी नाचवण्याची परंपरा आहे, ती परंपरा नक्की काय आहे ते जाणून घ्या..

कोकणातील पालखी परंपरा कशी आहे

कोकणात होळीला शिमगा असे म्हणतात. विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा उत्सव पाहायला मिळतो. शिमग्याची ही प्रथा प्रत्येक गावांनुसार बदलत जाते. काही ठिकाणी शिमगा उत्सव पाच दिवसांचा तर काही ठिकाणी 12 दिवस शिमगा उत्सव सुरू राहतो. या शिमगात्सोवाच विशेष म्हणजे पालखी होय. होळीच्या या काळात ग्रामदेवतेची पालखी घरोघरी नाचवली जाते. गाऱ्हाण घातलं जातं. दरवर्षी एका कुटुंबाला या पालखीचा मान दिला जातो.

कोकणात शिमगोत्सवाची धूम! नमन अन् संकासुर…; राजहंस नमन मंडळ जपतेय परंपरा

ग्रामदेवतेची पालखी मानकरी आणि ग्रामस्थ मंदिरातून बाहेर काढून ढोल ताश्याच्या गजरात घरोघरी नेतात. याला ‘खेला पालखी’ असे म्हणतात. काहीजण खाद्यांवर तर काही जण डोक्यावर पालखी घेऊन नाचतात. पण काही झालं तरी ही पालखी खाली ठेवली जात नाही. ही पालखी घेऊन नाचण्याची पद्धत ही तशीच विशेष आहे.

Holi 2026: होळी आणि धुलिवंदन आहेत दोन वेगळे दिवस, करू नका गल्लत आणि जाणून घ्या या दिवसांमधील फरक

पालखी प्रत्येक घरात गेल्यानंतर तिथे देवाला गाऱ्हाण घातलं जातं आणि रितसर नैवेद्य देखील अर्पण केला जातो. अनेक ठिकाणी धुलिवंदनाच्या दिवशी होलिकादहन केले जाते. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तिसऱ्या दिवशी बोंबाट’ साजरा केला जातो. या दिवशी गुरूचा नाद, शंकासुर यांसारखी सोंग देखील नाचवली जातात. पंचमीलाच म्हणजे शिमग्याच्या शेवटच्या दिवशी दशावताराचा कार्यक्रम आयोजित केला जातो. घरोघरी जाऊन रोभय म्हणजेच पैसे मागण्याचा खेळ लहान मुलं करतात. काही ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून शिमग्याचा शेवट करतात. तळकोकणात ही पालखी परंपरा तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. होळी साजरी करण्याची पद्धत सगळीकडे वेगळी असली तरी हा केवळ सण नसून कोकणवासीयांच्या एकजुटीचं आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचं मोठं माध्यम आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोकणात होळी आणि पालखीचा काय संबंध आहे?

    Ans: कोकणात होळी (शिमगा) सणाच्या काळात ग्रामदैवताची पालखी गावभर फिरवण्याची परंपरा आहे. ही पालखी मिरवणूक सणाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहाचे प्रतीक मानली जाते.

  • Que: कोकणात होळीला शिमगा असे का म्हणतात?

    Ans: कोकण व महाराष्ट्रातील काही भागांत होळीला “शिमगा” म्हणतात. हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचा आणि वाईट शक्तींवर चांगल्याच्या विजयाचा उत्सव मानला जातो.

  • Que: पालखी मिरवणुकीचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: पालखी गावभर फिरवणे म्हणजे देवतेचे गावावर संरक्षण राहावे, सुख-समृद्धी मिळावी आणि नकारात्मक शक्ती दूर जाव्यात अशी श्रद्धा असते.

Web Title: Holi 2026 what is the relationship between the palkhi and holi in konkan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • holi

संबंधित बातम्या

Jatashankar Mahadev Temple: गिरनार पर्वतावरील जटाशंकर महादेव मंदिराची काय आहे आख्यायिका, जाणून घ्या
1

Jatashankar Mahadev Temple: गिरनार पर्वतावरील जटाशंकर महादेव मंदिराची काय आहे आख्यायिका, जाणून घ्या

Puja Tilak: पूजेत केसर, चंदनासह किती प्रकारचे टिळा लावतात? जाणून घ्या प्रत्येकाचे धार्मिक महत्त्व
2

Puja Tilak: पूजेत केसर, चंदनासह किती प्रकारचे टिळा लावतात? जाणून घ्या प्रत्येकाचे धार्मिक महत्त्व

Numberlogy: मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Grah Gochar: सप्टेंबरमध्ये सूर्य आणि शुक्र यांच्यासह हे ग्रह बदलणार आपली हालचाल, या राशींच्या लोकांनी बाळगावी सावधगिरी
4

Grah Gochar: सप्टेंबरमध्ये सूर्य आणि शुक्र यांच्यासह हे ग्रह बदलणार आपली हालचाल, या राशींच्या लोकांनी बाळगावी सावधगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.