फोटो सौजन्य- pinterest
सूर्य देव लवकरच आपले नक्षत्र बदलणार आहे. कर्क राशीत राहून तो 3 ऑगस्ट रोजी पहाटे 4.16 वाजता आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करेल. आश्लेषा नक्षत्र हे बुध ग्रहाचे नक्षत्र असल्याचे मानले जाते.
ग्रहांचा राजा सूर्य सध्या कर्क राशीमध्ये विराजमान आहे. कर्क राशीमध्ये राहून तो सर्व राशींसाठी शुभ असणार आहे. दरम्यान कर्क राशीत राहून सूर्यदेव लवकरच नक्षत्र बदलणार आहेत. रविवार, 3 ऑगस्ट रोजी पहाटे 4.16 वाजता आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करेल. आश्लेषा नक्षत्र हे बुध ग्रहाचे नक्षत्र असल्याचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि बुध यांच्यात मैत्री असल्याने काही राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश, नोकरीच्या संधी आणि समाजामध्ये मान सन्मान मिळू शकतो. या नक्षत्र संक्रमणामुळे 3 राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. कोणत्या भाग्यवान राशी आहेत ते जाणून घ्या
सूर्याचे नक्षत्र बदल तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ राहणार आहे. या राशीतील नोकरी करणाऱ्या लोकांना चांगले पद मिळू शकते. तसेच जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे अशा लोकांना नवीन संधी मिळू शकतात. त्याचसोबत आर्थिक लाभाच्या संधी देखील मिळू शकतात. अविवाहित लोकांना लग्नांचे प्रस्ताव येऊ शकतात. सत्ता आणि सरकारशी संबंधित लोकांशी जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे कल वाढेल. तरुणांमधील आत्मविश्वास वाढेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभाच्या संधी मिळतील.
सूर्याचे नक्षत्र बदल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. अधिकाऱ्यांच्या चांगल्या समन्वयामुळे चांगले पद मिळण्याची शक्यता आहे. यावेळी जे लोक व्यवसायाशी संबंधित आहे त्यांना चांगला नफा होऊ शकतो. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. या लोकांना कामानिमित्त बाहेर जावे लागू शकते. तुमच्यासाठी प्रवास करणे फायदेशीर ठरेल. तुमच्यावरील आर्थिक ताण कमी होऊन तुम्हाला मानसिक शांती मिळेल.
मीन राशीच्या लोकांसाठी सूर्याचे नक्षत्र बदल खूप शुभ असणार आहे. कठोर मेहनत घेतल्याने समाजात तुमची प्रतिमा सुधारेल. करिअरमध्ये तुमची प्रगती होऊ शकते. वैवाहिक जीवन अनुकूल राहू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील. जे लोक नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. नातेसंबंध पूर्वीपेक्षा चांगले होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)