फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये आषाढ अमावस्येला विशेष महत्त्व आहे. ही अमावस्या आज सर्वत्र साजरी केली जाणार आहे. या अमावस्येच्या दिवशी दिव्यांच्या पूजेसोबत पूर्वजांना देखील समर्पित असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी दान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, दान केले की पूर्वजांना शांती मिळते आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. मान्यतेनुसार या दिवशी दान केल्याने तुम्हाला खूप फायदा होतो. तसेच कुंडलीमध्ये पितृदोष असल्यास दूर होतो. त्याचबरोबर जीवनात येणाऱ्या वारंवार अडचणी आणि समस्या दूर होतात. अमावस्येच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे, जाणून घ्या
अमावस्येच्या दिवशी काळे तीळ आणि काळ्या रंगाचे कपड्याचे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे कुंडलीमधील पितृदोष दूर होतात आणि घरातील नकारात्मकता देखील दूर होते.
अमावस्येच्या दिवशी गरिबांना अन्नदान करणे सर्वोत्तम मानले जाते. यामुळे पूर्वजांना संतुष्टी मिळते आणि घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही.
लवंग, वेलची आणि कापूर या सुगंधित वस्तूचे अमावस्येच्या दिवशी दान केल्याने घरातील वातावरण शुद्ध होते आणि मानसिक शांती मिळते. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता येते.
ज्या वस्तूंचा संबंध शनि ग्रहांशी आहे अशा वस्तूंचे दान करावे. जसे की, मोहरीचे तेल, लोखंडी भांडी किंवा खिळे इत्यादी गोष्टींचे दान केल्याने ग्रहांना शांती मिळते. तसेच ज्या लोकांना शनिच्या साडेसाती आणि धैय्याचा त्रास होत असल्याने या लोकांनी दान करावे.
या दिवशी गाईला हिरवा चारा खायला घालणे चांगले मानले जाते. यामुळे घरामध्ये शांती राहते आणि पूर्वज प्रसन्न होतात.
अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण देऊन कपडे आणि दक्षिणा देणे हे खूप फायदेशीर मानले जाते. पितरांना संतुष्ट करण्यासाठी हे सर्वोत्तम कर्म मानले जाते.
ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे किंवा जे लोक वारंवार आजारी पडत आहे, भांडण होत आहे. तसेच नोकरी आणि व्यवसायात सारखे अडचणी येणे. तसेच आर्थिक नुकसान होऊ शकते. ज्या लोकांना आपले पूर्वज वारंवार स्वप्नात दिसतात अशा लोकांनी अमावस्येच्या दिवशी दान करावे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)