फोटो सौजन्य- pinterest
वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण रविवार, 21 सप्टेंबर रोजी कन्या राशीमध्ये होणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात अदृश्य असले तरी, इतर अनेक देशांमध्ये ते दृश्यमान असेल. मात्र याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर विविध प्रकारे होताना दिसून येईल. सूर्यग्रहणादरम्यान, सूर्य आणि शनि यांच्यामध्ये समसप्तक योग तयार होईल. याचा अर्थ हे दोन्ही ग्रह एकमेंकांना तोंड देणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, केतू सूर्यग्रहणांना कारणीभूत ठरतो. सध्या तो सिंह राशीमध्ये आहे आणि सूर्याच्या अगदी जवळ आहे. मेष आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना करिअरमध्ये चढ-उतार जाणवू शकतात आणि कौटुंबिक जीवनात अनेक समस्या येऊ शकतात. सूर्यग्रहणाचा कोणत्या राशींच्या लोकांवर कसा परिणाम होईल, जाणून घ्या
मेष राशीमध्ये सहाव्या घरामध्ये सूर्यग्रहण होत आहे. या ग्रहणामध्ये शनिचे प्रतिकूल परिणाम आणखी वाढतील. यामुळे आरोग्याच्या समस्या आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात. याशिवाय तुम्हाला आर्थिक समस्यांना देखील तोंड द्यावे लागू शकते. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही मोठ्या चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्हाला कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेईचा असेल तर आता घेऊ नका.
सिंह राशीमध्ये सूर्यग्रहण दुसऱ्या घरामध्ये होणार आहे. सिंह राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल. कामाच्या ठिकाणी लोक तुमच्याशी वाईट वागू शकतात. तुमच्या पालकांसोबतचे तुमचे संबंध थोडे बिघडू शकतात. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल समाधान नसेल आणि ते नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात.
वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कन्या राशीत होणार आहे. त्यामुळे या लोकांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. यावेळी बुध ग्रह देखील तुमच्या राशीत असेल त्यामुळे तुमच्यासाठी हा काळ समिश्र राहू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या कौटुंबिक परिस्थितीकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या काळात तुम्हाला ज्या समस्या असतील त्या सोडवल्या जाऊ शकतात.
कुंभ राशीमध्ये सूर्यग्रहण हे आठव्या घरामध्ये होत आहे. यावेळी राहू देखील याच राशीत आहे. कुंभ राशीच्या लोकांना फक्त एकच नाही तर अनेक करिअर आव्हानांना तोंड द्यावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)