फोटो सौजन्य- pinterest
आज शुक्रवार, 19 सप्टेंबरचा दिवस विशेष आहे. आज चंद्र सिंह राशीमध्ये संक्रमण करणार आहे. तसेच आज प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्र हे महादेवांचे दोन शुभ व्रत देखील आहे. आज चंद्र शुक्राशी युती करेल, ज्यामुळे कला योग तयार होईल. सूर्य आणि चंद्र एकमेकांशी द्विद्वाश योग देखील तयार करतील त्यासोबतच सिद्धी योग देखील मघ नक्षत्राच्या संयोगाने तयार होत आहे. त्यामुळे महादेवांच्या आशीर्वादाने आणि सिद्ध योगाने वृषभ, सिंह, कन्या, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या राशीच्या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. या राशीच्या कुंडलीमध्ये चौथ्या आणि सहाव्या घरामध्ये शुक्राची युती होत असल्याने कला क्षेत्राकडे तुम्ही आकर्षिले जाऊ शकता. तुमच्या कलात्मक क्षमतेचाही तुम्हाला फायदा होईल. तसेच तुमच्या उत्पन्नात देखील वाढ होईल. जर तुम्ही कोणालाही पैसे उधार गिले असतील तर ते तुम्हाला परत मिळतील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी आजची परिस्थिती अनुकूल राहील.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती असलेल्याचा तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहणार आहे. व्यवसायातून तुम्हाला नफा मिळण्याची संधी मिळेल. कपडे किंवा दागिन्यांशी संबंधित कामात गुंतलेल्यांना आज फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. मात्र तुम्हाला आज खूप मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला सरकारी बाबींमध्ये यश मिळेल. जे लोक सरकारी योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले राहील.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्हाला तुमच्या जुन्या ओळखीतून फायदा होऊ शकतो. तुमच्या बुद्धिमत्तेचे आणि कार्यक्षमतेचा तुम्हाला फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांचा कामाच्या ठिकाणी आदर आणि प्रभाव वाढलेला राहील.
कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. कौटुंबिक जीवन चांगले राहील. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिऴेल. कौटुंबिक व्यवसायात गुंतलेल्यांना पैसे कमविण्यासाठी चांगली संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल. जे लोक भागीदारीमध्ये काम करत आहे त्यांना व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)