
फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांचा राजा सूर्य आपली रास आणि नक्षत्र बदल करत असतो. यावेळी तो आपले नक्षत्र बदलणार आहे. त्याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे व्यक्तीच्या जीवनावर होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार, 24 जानेवारी रोजी सूर्य श्रावण नक्षत्रात संक्रमण करणार आहे. या नक्षत्र संक्रमणाचा काही राशीच्या लोकांना फायदा होईल तर काहींना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. श्रावण हा चंद्राचे नक्षत्र आणि सूर्याचा मित्र ग्रह असला तरी या नक्षत्र संक्रमणामुळे काही राशीच्या जीवनात अनेक समस्या येऊ शकतात. कोणत्या राशीच्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागणार आहे ते जाणून घ्या
सूर्याच्या नक्षत्रातील बदलांमुळे या राशीच्या लोकांमधील आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तसेच तुम्हाला मानसिक समस्या देखील जाणवू शकतात. परंतु योग आणि ध्यान केल्याने परिस्थिती सुधारेल. तुम्हाला फसवणूक टाळावी लागेल, या काळात गरजेपेक्षा जास्त कोणावरही विश्वास ठेवू नका. प्रेम जीवनात चढ-उतार येऊ शकतात. ऑफिसमधील राजकारण टाळा, कारण यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. या राशीच्या लोकांनी या समस्यांवर उपाय म्हणून सूर्य देवाला पाणी अर्पण करावे.
सिंह राशीवर सूर्याचे राज्य आहे. परंतु नक्षत्रातील बदल तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकतात. तुम्ही कर्ज घेणे टाळावे, अन्यथा तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या शत्रूंपासून सावध राहा, कारण ते तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात. या राशीच्या काही लोकांना डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला हृदयरोग असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. सिंह राशीच्या लोकांनी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे.
सूर्याच्या नक्षत्र बदलामुळे कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. तुमची बचत एखाद्या गोष्टीवर खर्च होऊ शकते. योग्य बजेट तयार करणे आणि पुढे जाणे शहाणपणाचे ठरेल. तुमच्या वडिलांशी एखाद्या मुद्द्यावर मतभेद होऊ शकतात, त्यांच्याशी सभ्यतेच्या मर्यादेत बोला. कुंभ राशीच्या लोकांनी काळजीपूर्वक विचार न करता कोणतेही मोठे करिअर निर्णय घेणे टाळावे. या समस्या दूर करण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंची पूजा करणे फायदेशीर राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: 24 जानेवारीला सूर्य आपले नक्षत्र बदलणार आहे. सूर्याचा नक्षत्र बदल हा ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचा मानला जातो, कारण याचा करिअर, मान-सन्मान आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो.
Ans: सूर्य आत्मविश्वास, अधिकार आणि नेतृत्व दर्शवतो. नक्षत्र बदलामुळे काही राशींना कामात अडथळे, वरिष्ठांशी मतभेद किंवा निर्णयात विलंब जाणवू शकतो.
Ans: सूर्य नक्षत्रामुळे मिथुन, सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांनी सावध राहावे