फोटो सौजन्य- pinterest
आज सोमवार, 22 सप्टेंबरचा दिवस आश्विन महिन्याच्या प्रतिपदा पक्षामधील पहिला दिवस म्हणजेच आजपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होत आहे. आज पहिल्या दिवस देवी शैलपुत्रीची पूजा केली जाणार आहे. आज चंद्र दिवसरात्र कन्या राशीमध्ये संक्रमण करणार आहे. चंद्र, बुध आणि सूर्य एका युतीत असल्याने त्रिग्रही योग तयार होईल. तसेच गुरु आणि चंद्र यांच्या मध्यवर्ती स्थितीमुळे गजकेसरी योग तयार होईल. देवी शैलपुत्रीच्या आशीर्वादाने आज मेष, कर्क, तूळ, वृश्चिक आणि मीन या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तसेच तुमचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. आर्थिकदृष्ट्या तुमचा आजचा दिवस चांगला राहील. मात्र तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. कपडे आणि किराणा व्यवसायात गुंतलेल्यांना विशेष फायदा होईल. आज तुम्ही वाहनाची खरेदी करु शकता. तसेच धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता.
कर्क राशीच्या लोकांना शैलपुत्री देवीच्या आशीर्वादाने प्रत्येक कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला आज नशिबाची साथ मिळेल. तुम्हाला वरिष्ठांकडून सहकार्य मिळू शकेल. तुम्हाला काही बातम्या मिळू शकतात ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण सकारात्मक राहील. तुमच्या वरिष्ठांकडून आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे कोणतेही सरकारी काम आज वेळेमध्ये पूर्ण होऊ शकते.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ राहणार आहे. तुम्ही कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो. राजकीय आणि सामाजिक कार्यात सहभागी असलेल्यांना सन्मान मिळण्याची शक्यता. बॅंकेशी संबंधित असलेल्या लोकांना कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित लाभ होईल. तुमची प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही तुमचे काम उत्साहाने पूर्ण करू शकाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली असल्यास तुम्हाला आज त्याचा फायदा होईल. तुम्हाला वरिष्ठ व्यक्तीकडून पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळेल.
मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमचा कामाच्या आणि करिअरच्या बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल त्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुम्हाला सरकारी सेवांचाही फायदा होऊ शकतो. आद तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. विक्री आणि विपणन क्षेत्रात काम करणाऱ्यांना अपेक्षित फायदा होऊ शकतो. तुम्हाला मालमत्तेच्या व्यवहारातही नफा होऊ शकतो. किराणा आणि वाहनांशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)