Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tulsi Vastu Tips: तुळस दारात लावायची तर उजव्या बाजूला की डाव्या? चुकलं तर नुकसान होतं, ही दिशा लक्षात ठेवा

Tulsi Vastu Tips: हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला तुळस लावणे शुभ मानले जाते. तुळशीसाठी ईशान्य दिशा सर्वोत्तम असून पूर्व आणि उत्तर दिशाही योग्य मानल्या जातात.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 10, 2026 | 01:20 PM
Tulsi Vastu Tips: (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Tulsi Vastu Tips: (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

 

  • मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला तुळस लावणे शुभ मानले जाते.
  • तुळशीसाठी ईशान्य दिशा सर्वोत्तम मानली जाते.
  • तुळशीजवळ स्वच्छता ठेवा आणि संध्याकाळी दिवा लावा.

तुळशीसाठी वास्तू टिप्सः हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असते, त्या घरात आनंद, शांती आणि सकारात्मकता नांदते. म्हणूनच लोक अंगणात, बाल्कनीत किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुळस लावणे पसंत करतात.आपल्या घरात तुळस नसेल असं घर शोधून पण सापडणार नाही. सकाळी उठल्यावर तुळशीला पाणी घालणं, संध्याकाळी दिवा लावणं, हे आपल्या घरातलं रोजचं काम आहे. तुळस असली की घरात कसं प्रसन्न वाटतं. पण हीच तुळस चुकीच्या जागी लावली तर फायदा होण्याऐवजी मनाला टोचणी लागून राहते. म्हणून तुळस कुठे लावायची, कोणत्या बाजूला लावायची, हे आधी समजून घ्या. Tulsi Vastu Tips:

दाराच्या उजव्या बाजूला लावावी की डाव्या बाजूला?

बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की तुळशीचे रोप मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला लावावे की डाव्या बाजूला? वास्तूशास्त्रामध्ये यासंबंधी विशिष्ट नियम सांगितले आहेत.

वास्तूनुसार दाराच्या उजव्या बाजूला तुळस लावणं शुभ मानलं जातं. घरातून बाहेर जाताना उजवा हात ज्या बाजूला येईल, तिथे तुळस असावी. पण हे सगळं जागेवर अवलंबून असतं. काहींच्या दारात जागाच नसते. मग जबरदस्तीने तुळस दारातच कोंबायची नाही. जिथे तिला ऊन मिळेल, हवा मिळेल, आणि येण्या-जाण्याला अडचण होणार नाही, अशी जागा बघून लावावी. तुळशीला सारखं हलवावं लागू नये, म्हणून एकदा जागा ठरवली की तीच पक्की करा.

तुळशीसाठी सगळ्यात चांगली दिशा कोणती?

वास्तुशास्त्रानुसार, ईशान्य दिशा तुळशीचे रोप लावण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, ही दिशा देव-देवतांशी संबंधित आहे. पूर्व आणि उत्तर दिशेला तुळस लावणे देखील शुभ मानले जाते.

Sawan 2026 Vastu Tips: श्रावण महिन्यात लावा ‘ही’ ५ चमत्कारी झाडे; वास्तूनुसार वाढेल पैशांचा ओघ

ईशान्य कोपरा हा देवांचा कोपरा मानतात. तिथे तुळस लावली की घरात बरकत येते, असं म्हटलं जातं. जर ईशान्यला जागा नसेल तर पूर्वेला किंवा उत्तरेला लावली तरी चालते. या दिशांना ऊन पण चांगलं मिळतं आणि तुळस पण छान वाढते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दक्षिण दिशेला तुळस लावू नका. दक्षिण दिशा तुळशीसाठी चांगली मानली जात नाही. दाराजवळ जागा नसेल तर बाल्कनीत किंवा अंगणात ईशान्येला ठेवा, पण दक्षिणेला नको.

तुळस जमिनीवर ठेऊ नका

धार्मिक श्रद्धेनुसार, तुळशीच्या रोपाला योग्य जागा आणि आदर दिला पाहिजे. त्यामुळे, तुळशीचे रोप थेट जमिनीवर ठेवण्याऐवजी उंच स्टँड किंवा स्टूलवर ठेवणे उत्तम.बऱ्याच जणांची सवय असते, कुंडी थेट जमिनीवर ठेवायची. पण तुळस ही देवासारखी आहे. तिला जरा उंचावर ठेवावी. एखादा स्टँड घ्या, किंवा छोटं वृंदावन बनवा. त्यात तुळस ठेवली की ती दिसायला पण भारी दिसते आणि पाय पण लागत नाही. घर पण नीटनेटकं दिसतं.

तुळशीजवळ घाण ठेवू नका

वास्तूनुसार, तुळशीच्या रोपाभोवतीच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. रोपाजवळ बूट, चपला, कचराकुंड्या किंवा इतर कचरा ठेवू नये.हा नियम सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुळशीजवळ चपला-बूट काढून ठेवणं, कचऱ्याची पिशवी ठेवणं, हे अजिबात करू नका. तुळशीभोवती नेहमी स्वच्छ ठेवा. वाळलेली पानं, फांद्या वेळच्या वेळी काढून टाका. तुळस सुकलेली दिसली की लगेच लक्ष द्या.

Spiritual News : सोमवार ते रविवार ‘या’ झाडांची पूजा मानली जाते शुभ; यामागचं काय आहे धार्मिक महत्त्व? जाणून घ्या

संध्याकाळी दिवा लावायला विसरू नका

हिंदू धर्मात, सकाळी आणि संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याची परंपरा आहे. कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा विशेष महत्त्वाची मानली जाते.संध्याकाळ झाली की तुळशीजवळ तुपाचा दिवा लावला की घरात कसं शांत वाटतं. दिवा लावताना फक्त एक काळजी घ्या, दिवा पानांना किंवा वाळलेल्या फांद्यांना लागणार नाही. जरा लांब ठेवा, नाहीतर तुळस जळायची भीती असते.

तुळस चांगली वाढण्यासाठी काय करावं?

  • तुळस फक्त धार्मिक नाही, तर औषधी पण आहे. त्यामुळे तिची काळजी घ्यायलाच पाहिजे.
  • ऊन – तुळशीला रोज ऊन मिळालंच पाहिजे. अंधारात ठेवू नका.
  • पाणी – माती सुकली कीच पाणी द्या. कुंडीत पाणी साचू देऊ नका. पाणी साचलं की मुळं सडतात.
  • वाळलेली पानं – आठवड्यातून एकदा वाळलेली पानं काढून टाका.
  • हवा – तुळस जिथे हवा खेळती आहे, तिथे ठेवा. बंद खोलीत ठेवू नका.
  • कुंडी – कुंडीला खाली छिद्र असलंच पाहिजे, म्हणजे जास्तीचं पाणी बाहेर जाईल.टीप म्हणून एकच सांगतो, हे सगळे नियम वास्तू आणि श्रद्धेवर आधारित आहेत. प्रत्येकाच्या घरची पद्धत थोडी वेगळी असू शकते. पण तुळशीला प्रेमाने, स्वच्छ ठेवलं तर ती नक्कीच तुमच्या घरात आनंद आणते.

Web Title: Tulsi vastu tips right direction and rules for home rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 01:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.