
फोटो सौजन्य- istock
वास्तूशास्त्रानुसार, घरामध्ये किचन, बाथरुम, बेडरुम बनवताना दिशानिर्देशांवर विशेष लक्ष दिले पाहिजे. यामुळे घरात सकारात्मकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते.
हिंदू धर्मामध्ये वास्तू विशेष महत्त्व आहे. वास्तूच्या नियमांनुसार, घराचे बांधकाम केले जाते. असे मानले जाते की, घरातील वास्तू योग्य दिशेला असली तर घरात सुख समृद्धी येते. त्याचबरोबर वाईट वास्तू माणसाच्या आयुष्यात समस्या वाढवू शकते. उत्तराखंड मुक्त विश्वविद्यालयाचे ज्योतिष विभागाचे सहायक प्राध्यापक आणि समन्वयक डॉ. नंदन कुमार तिवारी यांनी गृहनिर्माण विवेचन लिखित पुस्तकातून घर बांधताना स्वयंपाकघर, देव्हारा, ड्रॉइंग रूम, बेडरूम आणि इतर खोल्यांची वास्तू दिशा जाणून घेता येते.
हेदेखील वाचा- तुम्हाला अननस कापताना त्रास होतो का? या टिप्स वापरुन बघा
घर बांधणीशी संबंधित वास्तू टिप्स
वास्तूशास्त्रानुसार, घराच्या पूर्व दिशेला बाथरुम असले पाहिजे.
पूर्व दक्षिण दिशेला स्वयंपाकघर बांधणे शुभ असते.
बेडरुम दक्षिण दिशेला असावी. बेडरूममध्ये देवी-देवतांची चित्रे ठेवू नयेत.
ईशान्य किंवा आग्नेय कोपऱ्यात बेडरूम नसावी.
बाथरूममध्ये टाकी, शॉवर आणि वॉश बेसिन पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावेत.
हेदेखील वाचा- या राशींच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात भाग्य खुलण्याची शक्यता
जेवण बनवताना गृहिणीने नेहमी उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करावे. जेवणाचे टेबल पश्चिम दिशेला ठेवावे
उत्तर दिशेला तिजोरी ठेवावी.
घराच्या ईशान्य कोपऱ्यात मंदिर बांधावे. या दिशेचा स्वामी भगवान शिव आहे. त्यासोबतच देवी-देवतांचे फोटो पूर्व उत्तर दिशेला ठेवावे.
दक्षिण दिशेला पूजेची खोली नसावी तसेच मंदिराभोवती स्नानगृह आणि शौचालये बांधू नयेत.
शौचालये दक्षिण आणि पश्चिम दिशेला बांधावीत.
स्टोअर रूम ईशान्य दिशेला बांधावी.
दक्षिण आणि पश्चिम दिशेला स्टडी रुम बांधावी.
घराच्या ब्रह्म स्थानामध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये.
तसेच ईशान्य दिशेला पाण्याचे ठिकाण असावे. म्हणजेच बोरिंग, जलतरण, तलाव, पूजास्थान इत्यादी असावेत. या दिशेला मुख्य गेट असणे खूप चांगले.
दक्षिण पूर्व दिशेला गॅस, बॉयलर, ट्रान्सफार्मर असायला पाहिजे.
दक्षिण पश्चिम दिशेला म्हणजे नैऋत्य दिशेला खिडक्या दरवाजे नसावेत.
तुमच्या घराला अंगण असल्यास तुळस, डाळिंब, जामफळ, कडूलिंब, आवळा याशिवाय अंगणात सकारात्मक ऊर्जा देणारी फुलांची रोपे लावावी.