फोटो सौजन्य- istock
ज्योतिषशास्त्रानुसार, आज रविवार, 1 सप्टेंबर रोजी चंद्र बुधाच्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे. चंद्राचे हे संक्रमण सर्व 12 राशींच्या जीवनावर परिणाम करेल. शास्त्रामध्ये चंद्राला माता, मानसिक स्थिती, मनोबल, प्रवास, संपत्ती, सुख-शांती, डोळे, भावना, कल्पनाशक्ती यांसारख्या घटकांचा कारक ग्रह मानण्यात आला आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, आज रविवार, 1 सप्टेंबर रोजी चंद्र बुधाच्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे. चंद्राचे हे संक्रमण सर्व 12 राशींच्या जीवनावर परिणाम करेल. शास्त्रामध्ये चंद्राला माता, मानसिक स्थिती, मनोबल, प्रवास, संपत्ती, सुख-शांती, डोळे, भावना, कल्पनाशक्ती यांसारख्या घटकांचा कारक ग्रह मानण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत चंद्राच्या मजबूत स्थितीमुळे त्याला दीर्घायुष्य मिळते. याशिवाय, साधकाला जीवनात सुख-शांतीचा अनुभव येतो आणि आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही. जाणून घेऊया अशा राशींबद्दल ज्यांना चंद्र संक्रमणाचा फायदा होईल.
हेदेखील वाचा- सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या सण, उपवास यांची यादी जाणून घ्या
मेष रास
सप्टेंबर महिना मेष राशीच्या लोकांसाठी संमिश्र राहाणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला आनंदी असाल. कुटुंबाचे सहकार्य या काळात मिळेल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक राहाल. अहंकाराची भावना तुमच्यात प्रबळ होऊ शकते. बोलण्याने आणि वागण्याने इतरांना दुखावू शकता
धनु रास
कन्या राशीत चंद्राचा प्रवेश धनु राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करेल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक स्थितीत बळ येईल. तब्येतीत सुधारणा होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.
हेदेखील वाचा- घरातील भिंती स्वच्छ करण्यासाठी या टिप्स वापरुन बघा
कुंभ रास
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राच्या राशीतील बदलाचा कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होईल. या लोकांना जुने पैसे गुंतवून चांगला फायदा मिळू शकतो. व्यवसायातही वाढ होईल. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. चंद्र संक्रमण काळात मनातील अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात.
मीन रास
मीन राशीच्या लोकांसाठी चंद्राचे भ्रमण फायदेशीर ठरेल. या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित परिणाम मिळतील. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. याशिवाय व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त आर्थिक लाभ होईल. तसेच, पैसे गुंतवण्यासाठी ही चांगली वेळ असेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
(टीप – ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)