फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येक व्यक्तीला पैशाची कमतरता भासत असते. खूप मेहनत करुन पैसे कमावल्यावर सुद्धा ते घरामध्ये टिकत नाही, कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होतात. अशा वेळी काही उपाय करणे फायदेशीर ठरते. जाणून घ्या घरात संगमरवरी कामधेनू मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी, का ठेवावी त्याचे काय फायदे होतात.
वास्तुशास्त्राच्या म्हणण्यानुसार घरामध्ये आग्नेय दिशा ही शुक्राची दिशा मानली जाते. ही दिशा अग्नीचा प्रदेश मानली जाते. या दिशेचा थेट संबंध शुक्र ग्रहाशी येतो. शुक्र ग्रह हा वैभव, संपत्ती, सौंदर्य आणि सुखसोयींशी संबंधित आहे. जर ही दिशा संतुलिता असल्यास घरामध्ये समृद्धी राहते आणि पैसा येत राहतो, असे म्हटले जाते.
पौराणिक मान्यतेनुसार, कामधेनू गाय ही इच्छा पूर्ण करणारी गाय असल्याचे म्हटले जाते. ही गाय देवतांना प्रिय असल्याचे म्हटले जाते. तसेच या गाईला लक्ष्मीचे स्वरुप देखील मानले जाते. ज्या ठिकाणी कामधेनु गाय असते त्या ठिकाणी कधीही धन आणि सुख समृद्धीची कमतरता भासत नाही.
तुम्ही घरामध्ये संगमरवरापासून बनवलेली कामधेनूची मूर्ती आग्नेय दिशेला ठेवल्यास संपत्तीच्या प्रवाहाला मोठ्या प्रमाणात गती मिळते. कामधेनूची मूर्ती संगमरवरी असल्याने तिचा रंग पांढरा असतो. पांढरा रंग हा शांती, पवित्रता आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले जाते. शुक्र ग्रहाला रंग प्रिय असल्याचे ज्योतिषशास्त्रात म्हटले जाते. ज्यावेळी हे सर्व घटक एकाच ठिकाणी एकत्र येतात तेव्हा घराची आर्थिक ऊर्जा आपोआप सक्रिय होते.
कामधेनुची मूर्ती स्वच्छ जागेवर आग्नेय दिशेला ठेवावी
दर शुक्रवारी कामधेनूवर गुलाबाच्या सुगंधी अत्तर शिंपडावे.
कामधेनूसमोर दिवा लावून लक्ष्मी मंत्राचा जप करावे.
कामधेनुची मूर्ती कधीही जमिनीवर ठेवू नका. तर ती मूर्ती स्टॅण्ड किंवा स्टूलावर ठेवावी.
ही मूर्ती एक धार्मिक आणि शुभ असल्यामुळे तिचा सजावटीमध्ये कधीही वापर करु नये.
कामधेनुची मूर्ती कधीही खराब होणार नाही याची खात्री करुन घ्यावी.
कामधेनुची मूर्ती स्पष्ट आणि श्रद्धेने ठेवावे. त्यामुळे 21 ते 45 दिवसांमध्ये याचा परिणाम तुम्हाला दिसून येऊ शकतो. पैसे अडकणे किंवा इतर काही आर्थिक समस्या उद्भवत असल्यास त्या दूर होतील. एखाद्यावर जुने कर्ज असतील तर ते दूर होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)