Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Balcony Vastu Tips: घराची बाल्कनी कोणत्या दिशेला असावी, जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम

Balcony Vastu Tips: घरामध्ये बाल्कनीला विशेष महत्त्व असते. वास्तुशास्त्रानुसार, बाल्कनीची योग्य दिशा आणि तिथे ठेवलेल्या वस्तूंचा घरातील सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होतो. मान्यतेनुसार, वास्तुच्या नियमांचे पालन केल्याने घरात सुख, समृद्धी नांदते, असे मानले जाते. घरातील बाल्कनीविषयी वास्तूचे नियम जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 23, 2026 | 01:20 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • वास्तुशास्त्रानुसार घराची बाल्कनी उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला असणे शुभ मानले जाते.
  • बाल्कनीमध्ये नैसर्गिक प्रकाश आणि हवा येण्यासाठी पुरेशी जागा असावी.
  • बाल्कनीमध्ये नैसर्गिक प्रकाश आणि हवा येण्यासाठी पुरेशी जागा असावी
 

बाल्कनी हे केवळ ताजी हवा आणि सूर्यप्रकाशाचा आनंद घेण्याचे ठिकाण नाही, तर वास्तुशास्त्रामध्येही त्याला विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार, बाल्कनीची योग्य दिशा आणि तिथे ठेवलेल्या वस्तूंचा घराच्या सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होऊ शकतो. अशावेळी बाल्कनीशी संबंधित वास्तुचे नियम लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रानुसार घराची बाल्कनी कशी असावी आणि बाल्कनीत कोणत्या वस्तू ठेवणे शुभ आहे ते जाणून घ्या

बाल्कनीची दिशा

बाल्कनी योग्य दिशेला असणे खूप महत्त्वाचे मानले जाते. कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते, अशी मान्यता आहे. वास्तूनुसार, उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला बाल्कनी बांधणे शुभ मानले जाते, कारण या दिशांना सूर्यप्रकाश मिळतो. मात्र, नैऋत्य किंवा दक्षिण दिशेला तोंड असलेली बाल्कनी टाळावी.

Vastu Tips: डायनिंग टेबलसमोर आरसा लावणे मानले जाते शुभ, सुख-समृद्धीसाठी जाणून घ्या नियम

बाल्कनीतील फर्निचर आणि रंग

बाल्कनी मोठी असल्यास नैऋत्य दिशेला फर्निचर ठेवावे. बाल्कनीतील फर्निचर आणि रंगांची निवड यांचाही वास्तूवर परिणाम होतो. वास्तूनुसार, फर्निचर लोखंडाऐवजी लाकडाचे असावे आणि बाल्कनीच्या भिंतींसाठी हलक्या रंगांची व पेस्टल रंगांची निवड करावी.

बाल्कनीचा आकार

वास्तूनुसार, बाल्कनी नेहमी चौरस किंवा आयताकृती असावी; इतर कोणताही आकार टाळावा. सकारात्मक ऊर्जेसाठी, बाल्कनीच्या ईशान्य दिशेला तुळस, झेंडू, पुदिना, हळद इत्यादी लहान रोपे लावावीत. मनी प्लांट किंवा हंगामी फुलझाडे लावल्याने कौटुंबिक कलह टाळण्यासही मदत होऊ शकते.

Vastu Tips: मिठाचा डबा स्टीलचा की काचेचा? स्वयंपाकघरात मीठ ठेवताना ‘या’ चुका टाळा

बाल्कनीतील छताकडील भाग

वास्तुशास्त्रानुसार, बाल्कनीचे छत संपूर्ण घराच्या छतापेक्षा कमी उंचीचे असावे. जर तुम्ही बाल्कनीमध्ये झोपाळा लावणार असाल, तर तो वायव्य दिशेला असावा, जेणेकरून तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे लागेल. बाल्कनीमध्ये पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडेही टांगले पाहिजे, ज्यामुळे घरातील सर्वजण आनंदी राहतील.

बाल्कनीचा रंग आणि सजावट

बाल्कनीच्या भिंतींना फिकट किंवा पेस्टल रंग (जसे की पांढरा, फिकट निळा किंवा हिरवा) निवडा. बाल्कनीची सजावट करताना तुळस, मनी प्लांट, बांबू किंवा हलकी कुंडीतील रोपे लावा. खूप मोठी किंवा काटेरी रोपे लावणे टाळा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वास्तुशास्त्रानुसार घराची बाल्कनी कोणत्या दिशेला असावी?

    Ans: वास्तुशास्त्रानुसार घराची बाल्कनी उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला असणे शुभ मानले जाते.

  • Que: दक्षिण दिशेला बाल्कनी असणे योग्य आहे का?

    Ans: वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार दक्षिण दिशेच्या बाल्कनीसाठी योग्य नियोजन आणि सजावटीकडे विशेष लक्ष द्यावे.

  • Que: बाल्कनीमध्ये कोणत्या रंगांचा वापर करावा?

    Ans: वास्तुशास्त्रानुसार पांढरा, क्रीम, फिकट पिवळा आणि हलका हिरवा यांसारखे प्रसन्न रंग वापरणे योग्य मानले जाते

Web Title: Vastu tips direction of the balcony of the house vastu rules pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: मिठाचा डबा स्टीलचा की काचेचा? स्वयंपाकघरात मीठ ठेवताना ‘या’ चुका टाळा
1

Vastu Tips: मिठाचा डबा स्टीलचा की काचेचा? स्वयंपाकघरात मीठ ठेवताना ‘या’ चुका टाळा

Vastu Tips: डायनिंग टेबलसमोर आरसा लावणे मानले जाते शुभ, सुख-समृद्धीसाठी जाणून घ्या नियम
2

Vastu Tips: डायनिंग टेबलसमोर आरसा लावणे मानले जाते शुभ, सुख-समृद्धीसाठी जाणून घ्या नियम

Vastu Tips: सूर्यास्तानंतर या वस्तूंची खरेदी करणे टाळा, अन्यथा आर्थिक समस्यांचा करावा लागेल सामना
3

Vastu Tips: सूर्यास्तानंतर या वस्तूंची खरेदी करणे टाळा, अन्यथा आर्थिक समस्यांचा करावा लागेल सामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.