फोटो सौजन्य- pinterest
ऑफिसला जाण्यापूर्वी आपल्या बॅगेमध्ये आवश्यक वस्तू ठेवणे गरजेचे आहे. पण अशा काही वस्तू आहेत त्या ठेवणे शुभ मानले जाते तर काही वस्तू अशुभ मानल्या जातात. जसे की, लॅपटॉप, कागदपत्रे, चार्जर, पेन, डायरी आणि इतर अनेक गोष्टी आपण सोबत ठेवू शकता. मात्र वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी ठेवल्याने तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे येऊ शकतात. बऱ्याचदा आपण विचार न करता काही गोष्टी बॅगेत ठेवतो त्यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते आणि त्याचा परिणाम आपल्या कामाच्या ठिकाणी होऊ शकतो. तसेच करिअर आणि पदोन्नतीवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. ऑफिसच्या बॅगेमध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नये, जाणून घ्या
बऱ्याचदा आपण जुनी बिले, पावत्या किंवा निरुपयोगी कागदपत्रे बॅगेमध्ये ठेवतो पण या गोष्टी बॅगेत ठेवल्याने आपल्याकडे नकारात्मकता आकर्षित होते. कारण जुने किंवा फाटलेले कागदपत्रे अडथळ्याचे आणि कामाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे ऑफिसची बॅग नेहमी स्वच्छ ठेवावी आणि आवश्यक तेवढे कागदपत्र बॅगेत ठेवावे.
ऑफिसच्या बॅगेत पेन ठेवणे खूप महत्त्वाचे मानले जाते. खराब झालेला किंवा न चालणारा पेन ठेवणे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार ऑफिसच्या बॅगेत असे पेन ठेवणे म्हणजे अडथळा आणण्याचे सुचित करते. जर एखादा पेन संपला असेल किंवा खराब झाला असेल तर तो बॅगेत ठेवू नये. त्यामुळे नेहमी चांगल्या दर्जाचा आणि चांगला चालणारा पेन वापरावा त्यामुळे सकारात्मक ऊर्जा कार्यरत राहील.
बऱ्याचदा ऑफिसमध्ये दुपारी जेवल्यानंतर उरलेले अन्न आपण बॅगेत ठेवून देतो आणि घरी गेल्यानंतर ते बॅगेतून काढायला विसरतो त्यामुळे ते दुसऱ्या दिवसापर्यंत तसेच राहते. ही सवय केवळ आरोग्यासाठी वाईट नाही तर वास्तुशास्त्रानुसार चुकीची देखील आहे. शिळ्या अन्नामुळे नकारात्मकता पसरवते. तसेच करिअरच्या प्रगतीमध्ये अडथळा देखील निर्माण करते.
वास्तुशास्त्रानुसार, ऑफिसच्या बॅगेमध्ये चाकू, ब्लेड किंवा कात्री यासारख्या अनावश्यक धारदार वस्तू ठेवणे अशुभ आहे. या गोष्टीमध्ये संघर्ष आणि तणावाचे प्रतीक देखील असल्याचे मानले जाते. जर तुम्हाला कामासाठी या गोष्टी आवश्यक असल्यास ते व्यवस्थित पॅक करुन वेगळ्या ठिकाणी ठेवा त्यामुळे त्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर होणार नाही.
बऱ्याचदा चॉकलेट रॅपर्स, पिन, तुटलेल्या क्लिप्स किंवा प्लास्टिकचे तुकडे यासारख्या निरुपयोगी गोष्टी बॅगमध्ये जमा होतात. ही घाण बॅगेमधील नकारात्मक उर्जेचा केंद्रबिंदू बनवते. ऑफिस बॅग दर आठवड्याला स्वच्छ करा आणि त्यात फक्त आवश्यक आणि उपयुक्त गोष्टी ठेवा.
लाल किंवा पिवळा रंगांचा रुमाल बॅगेत ठेवू शकता. ज्याला सकारात्मकता आणि उर्जेचे प्रतीक मानले जाते.
यश प्राप्त करण्यासाठी गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मीची छोटी मूर्ती बॅगेत ठेवणे शुभ मानले जाते.
ऑफिसच्या बॅगेमध्ये काही वस्तू ठेवणे तुमच्या दैनंदिन कामाचा आणि उर्जेचा एक भाग आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम तुमच्या मूड, विचार आणि करिअरवर परिणाम होतो. त्यामुळे ही जागा नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. यामुळे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)