फोटो सौजन्य- pinterest
घरातील स्वयंपाकघर हे फक्त अन्न शिजवण्याचे ठिकाण नसून संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचे, आनंदाचे आणि उर्जेचे मुख्य केंद्र आहे. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघर हे अग्नि तत्वाचे स्थान मानले जाते त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा तुमच्या घराच्या सकारात्मकतेवर परिणाम होतो. अनेकवेळा स्वयंपाकघर सजवण्यासाठी सुंदर टाइल्स लावतात मात्र कधी कधी विचार न करता निवडलेल्या टाइल्स तुमच्या घराचे वास्तू खराब होऊ शकता. याचा परिणाम घराच्या वातावरणावर होत नाही तर कुटुंबातील नातेसंबंध आणि आरोग्यावर त्याचा संबंध होऊ शकतो. जर तुम्ही स्वयंपाकघरासाठी नवीन टाइल्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींचा समावेश करा. स्वयंपाकघरात टाइल्स निवडताना चुका झाल्यास वास्तूदोष कसा होऊ शकतो, जाणून घ्या
तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात सकारात्मक ऊर्जा हवी असल्यास काळ्या किंवा खूप गडद रंगाच्या टाइल्स वापरु नका. खासकरुन ज्या टाइल्सवर एम्बॉस्ड डिझाइन असतात. वास्तुशास्त्रानुसार, असे रंग नकारात्मक ऊर्जा वाढवतात. तसेच घरामध्ये चिडचिड, राग आणि कलह यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ऑफ-व्हाइट, क्रीम किंवा हलका पिवळा अशा हलक्या रंगांची निवड केल्यास स्वयंपाकघरामध्ये नेहमी सकारात्मकता टिकून राहते.
हल्ली बाजारामध्ये भेगा पडलेल्या किंवा तुटलेल्या टाइल्सचा ट्रेंड खूप आहे, परंतु स्वयंपाकघरात या टाइल्स बसवणे हा एक मोठा वास्तुदोष मानला जातो. अशा टाइल्समुळे घरात तुटणे, वाद आणि मानसिक ताण येऊ शकतो. क्रॅक पॅटर्न कुटुंबातील सदस्यांमधील अंतर आणि अस्थिरतेचे प्रतीक मानले जाते. स्वयंपाकघरात नेहमी साध्या आणि स्वच्छ टाइल्सचा वापर करावा.
चमकदार टाइल्स या नेहमी सुंदरच दिसतात. वास्तुनुसार स्वयंपाकघरात याचा जास्त वापर करणे योग्य नाही. जास्त चमक डोळ्यांना त्रास देते आणि मनात अस्वस्थता निर्माण करते. यामुळे मानसिक असंतुलन आणि ताण येऊ शकतो. जर तुम्हाला चमक आवडत असल्यास अर्ध-चमकदार टाइल्स निवडा ज्यामुळे स्वयंपाकघरात शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण होईल.
गॅस नेहमी आग्नेय दिशेला ठेवा
सिंक आणि गॅस समोरासमोर नसावे.
स्वयंपाकघरामध्ये हलके आणि उबदार रंगांचा वापर करा
कचरा आणि घाण साचू देऊ नका, अन्यथा सकारात्मक ऊर्जा थांबते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)