फोटो सौजन्य- pinterest
घर खरेदी करणे किंवा बांधणे हा आपल्या जीवनामधील एक मोठा निर्णय असतो. यावेळी त्याचे स्थान, डिझाइन एवढ्याकडे न बघता वास्तूकडेही पाहिले पाहिजे. विशेषतः जर घर पश्चिम दिशेला असल्यास वास्तूच्या काही नियमांचे पालन करायला हवे. पश्चिम दिशेला वास्तूदोष असल्यास अनेक समस्या उद्भवतात असे मानले जाते. यावेळी योग्य नियोजन आणि काही सोप्या बदलांनी हे दोष दूर केले जाऊ शकतात. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते. त्यासोबतच नातेसंबंधामध्ये कायम गोडवा राहतो आणि आर्थिक स्थिती देखील सुधारते. पश्चिम दिशेला घर असणे अशुभ आहे का, त्यावरील वास्तूचे उपाय जाणून घ्या
बऱ्याच वेळा लोकांना असे वाटते की, पश्चिमेकडे तोंड असलेल्या घरात राहणे अशुभ आहे. परंतु हे खरे नाही, जर घराची योजना वास्तुनुसार केली असल्यास ही दिशा इतर दिशांइतकीच शुभ मानली जाते. यामध्ये फरक एवढाच असतो की, दरवाज्यांचे स्थान, खोल्यांचे लेआउट आणि प्रकाश व्यवस्था या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष द्यावे लागते.
वास्तुशास्त्राच्या म्हणण्यानुसार, घराचा दरवाजा पश्चिम दिशेकडच्या तिसऱ्या किंवा चौथ्या भागात बांधावे. वायव्य कोपऱ्याजवळ दरवाजा बांधणे खूप शुभ मानले जाते. मात्र नैतृत्य दिशेजवळ दरवाजा बांधणे टाळावे. असे म्हटले जाते की, नैतृत्य दिशेकडून नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करु शकते. दरवाजाजवळ स्वच्छता, प्रकाशयोजना आणि सजावटीची देखील काळजी घेणे महत्त्वाचे असते.
पश्चिमेकडे तोंड असलेल्या घरामध्ये वायव्य किंवा पश्चिम दिशेला ड्रॉईंग रूम ठेवणे चांगले मानले जाते. या घरामध्ये पश्चिम दिशेला फर्निचर भिंतीच्या बाजूने ठेवा तर जड वस्तू नैऋत्य दिशेला ठेवावे. यामुळे संतुलन चांगले राहते. घरात नकारात्मक ऊर्जा टिकून राहते. भिंतींवर हलके रंग आणि खिडक्या उघड्या ठेवल्याने देखील घर ताजेतवाने राहते.
पश्चिमेकडे तोंड असलेल्या घरातमध्ये देव्हारा ईशान्य दिशेला ठेवणे चांगले. तर, आग्नेय दिशेला स्वयंपाकघर बांधणे शुभ मानले जाते. तसेच वायव्य दिशेला स्वयंपाकघर असणे देखील शुभ मानले जाते.
दरवाज्याजवळ पितळेची किंवा तांब्याची घंटा ठेवा.
तसेच घरामध्ये वेळोवेळी गंगाजल शिंपडा.
त्यासोबत पश्चिम दिशेच्या भिंतीवर सूर्याचे चित्र लावा.
घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारावर पुरेसा सूर्यप्रकाश येईल असे बघा
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)