फोटो सौजन्य- pinterest
वास्तुशास्त्रानुसार, दैनंदिन सवयी या केवळ शारीरिक हालचालींशी जोडलेल्या गेलेल्या नसतात तर घराच्या उर्जेशी आणि शांतीशी देखील जोडल्या गेल्या आहेत. विशेषतः खाण्यापिण्याशी संबंधित गोष्टी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. आपले अन्न केवळ शरीराचे पोषण करत नाही तर संपूर्ण घराच्या प्रगतीचा आणि सकारात्मकतेचा आधार आहे. जसे की, जेवणातचे ताट हे आपल्यासमोर ठेवल्यावर ते फक्त अन्नच नाही तर एक ऊर्जा बनते. जर यावेळी काही चुका झाल्या तर ती ऊर्जा उलट दिशेने काम करू शकते. वास्तुशास्त्रात जेवणाच्या वेळी काही गोष्टींना सक्त मनाई आहे. जेवणाच्या वेळी कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये, जाणून घ्या
वास्तुशास्त्रानुसार, जेवायच्या वेळी उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करुन बसणे चांगले मानले जाते. दक्षिण दिशा ही यमाची संबंधित आहे या दिशेला तोंड करुन जेवण केल्यास शरीरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते, अशी मान्यता आहे. यामुळे मानसिक अशांतता, आरोग्य समस्या आणि आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.
जर तुम्ही जेवायला बसताना डायनिंग टेबल पूर्ण रिकामे नसल्याची खात्री करुन घ्यावी. डायनिंग टेबलावर फळे, मिठाई किंवा एखादा पदार्थ ठेवावा. वास्तुनुसार, रिकामे टेबल गरिबीला आमंत्रण देते. टेबलावर काहीतरी ठेवल्याने घरात समृद्धी येते.
आजकाल लोक आरामात जेवण्यासाठी बेडवर बसून जेवतात. परंतु वास्तुशास्त्रात ही सवय खूप हानिकारक मानली जाते. बेडवर जेवण केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा कमकुवत होते आणि पैशाची कमतरता निर्माण होते.
बऱ्याच वेळा लोक जेवताना मीठ वरुन टाकतात आणि जे उरेल ते थेट कचऱ्यात फेकून देतात. वास्तुशास्त्रानुसार मीठ हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्याचा अनादर केल्याने घरात त्रास आणि दारिद्र्य वाढू शकते. उरलेल्या मिठात थोडे पाणी घालून ते ओतणे किंवा सिंकमध्ये ओतणे शुभ मानले जाते.
रात्री जेवणानंतर खरकटी भांडी तशीच ठेवून देणे ही एक सामान्य सवय आहे. वास्तुशास्त्रानुसार हे चुकीचे आहे. रात्रभर घाणेरडी भांडी ठेवल्याने घराच्या शांती आणि आनंदावर परिणाम होतो आणि पैशाचे नुकसान होऊ शकते. झोपण्यापूर्वी भांडी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा.
वास्तुशास्त्रानुसार, जेवत असताना तुमचे सर्व लक्ष अन्नावर असले पाहिजे. जर तुम्ही मोबाईल किंवा टीव्हीमध्ये व्यस्त असाल तर अन्नाची ऊर्जा आणि शरीर यांच्यातील समन्वय बिघडते. यामुळे केवळ पचन समस्या निर्माण होत नाहीत तर घरातील नात्यांमध्येही अंतर वाढू शकते. या सवयींमुळे वास्तू दोष निर्माण होतो. जो तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)